Electric SUVs: गेल्या आर्थिक वर्षात देशात 1 दशलक्षहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) विक्री झाली. जी चालू आर्थिक वर्षात आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. इलेक्ट्रिक वाहनांची ही वाढती मागणी लक्षात घेता, अनेक वाहन निर्माते येत्या काही काळात त्यांच्या लोकप्रिय ICE मॉडेल्सच्या इलेक्ट्रिक आवृत्त्या बाजारात आणणार आहेत. देशातील आगामी इलेक्ट्रिक SUV कारची यादी पाहूया.
टाटा पंच ईव्ही (Tata Punch EV)
ही टाटाची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे. पंचची इलेक्ट्रिक आवृत्ती 2023 च्या शेवटी लॉन्च होण्याची शक्यता आहे. टाटा पंच EV नवीन सिग्मा प्लॅटफॉर्मवर डिझाइन केली जाईल, जे मोठ्या बॅटरीसाठी अनुकूल आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही इलेक्ट्रिक SUV 26kWh आणि 30.2kWh बॅटरी पॅकसह उपलब्ध केली जाईल. या कारची रचना त्याच्या ICE मॉडेलपेक्षा थोडी वेगळी असू शकते.
ह्युंदाई क्रेटा ईव्ही (Hyundai Creta EV)
ह्युंदाई मोटर (Hyundai Motor) तिच्या सर्वात लोकप्रिय SUV क्रेटाच्या इलेक्ट्रिक व्हर्जनची चाचणी करत आहे. क्रेटा SUV 2025 च्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता आहे. यात कोना इलेक्ट्रिक प्रमाणेच 39.2kWh लिथियम-आयर्न बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे. ही पॉवरट्रेन 136bhp पॉवर आणि 395Nm टॉर्क जनरेट करते.
महिंद्रा XUV 700 EV (Mahindra XUV 700 EV)
महिंद्रा 2024 च्या अखेरीस आपली लोकप्रिय XUV 700 एसयूव्ही इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह लॉन्च करू शकते. ही नवीन XUV.e सब-ब्रँड अंतर्गत ऑफर केली जाईल. रिपोर्ट्सनुसार, या इलेक्ट्रिक SUV मध्ये 80kWh पर्यंतचा बॅटरी पॅक आणि AWD सिस्टम मिळू शकते. त्याची डिझाईन सध्याच्या ICE मॉडेलपेक्षा किंचित अजून चांगली असेल.
किया केरेन्स ईव्ही (Kia Carens EV)
किया (Kia) त्यांची Carens MPV इलेक्ट्रिक कार पॉवरट्रेनसह लॉन्च शकते. नुकतेच दक्षिण कोरियामध्ये या कारची चाचणी पार पडली. ही कार 2025 पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनी कारच्या डिझाइनमध्ये काही बदल करू शकते.
टाटा हॅरियर/सफारी ईव्ही (TATA Harrier/Safari EV)
टाटा मोटर्स (Tata Motors) लवकरच इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह हॅरियर (Harrier) आणि सफारी (Safari) एसयूव्ही लॉन्च करू शकते. कंपनीने या कार ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित केल्या होच्या. नुकतीच सफारी ईव्हीची चाचणी देखील झाली. सफारी कारमध्ये 500 किमीपर्यंतची रेंज मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
Diesel Cars Ban: डिझेल वाहन खरेदी करणार असाल तर सावधान! सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Car loan Information:
Calculate Car Loan EMI