Electric Car Care Tips : जास्त मायलेज देणाऱ्या वाहानांना ग्राहकांची नेहमीच जास्त पसंती मिळले. दुचाकी (2 Wheeler) असो किंवा चारचाकी (4 Wheeler) सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांच्या यादीत सर्वाधिक जास्त मायलेज देणाऱ्या वाहानांचाच समावेश असतो. याचं कारण म्हणजे, पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर. पेट्रोल-डिझेलचे सातत्यानं वाढणारे दर आता सर्वसाान्यांना परवडत नाहीत. त्यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.


अनेक लोक इलेक्ट्रिक कार किंवा दुचाकी खरेदी करण्यास पसंती दर्शवत आहेत. इलेक्ट्रिक कार या सामान्य कारच्या तुलनेत महाग आहेत. मात्र, या कारचा मेन्टेन्स सर्वात कमी असतो. परंतु, सध्या इलेक्ट्रिक कारसाठी पुरेशा सुविधांचा अभाव आहे. म्हणूनच इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.    


इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी


इलेक्ट्रिक वाहनं बनवणाऱ्या कंपन्या त्यांच्या कारच्या बॅटरीवर आठ वर्षांपर्यंतची वॉरंटी देतात. मात्र, जर तुम्ही तुमच्या वाहनांची योग्य पद्धतीने काळजी घेतली तर साधारण दहा वर्ष तुम्ही ती कार वापरू शकता. 10 वर्षांच्या वापरानंतर, बहुतेक ग्राहक त्यांचे वाहन बदलण्यास प्राधान्य देतात.


बॅटरी खराब झाल्यास 'हा' संकेत मिळतो 


इतर कोणत्याही गोष्टीत वापरल्या जाणार्‍या बॅटरीप्रमाणेच इलेक्ट्रिक कारची बॅटरी खराब झाल्यावर सिग्नल देऊ लागते. हा सिग्नल वेळीच ओळखणं गरजेचं आहे. जसे की, वाहनाच्या ड्रायव्हिंग रेंजमध्ये घट, सतत चार्जिंगची गरज. या सिग्नलवरून, तुम्ही समजू शकता की, आता बॅटरीची वेळ जवळजवळ संपत आली आहे. 


महाग असते बॅटरी 


बाईक किंवा स्कूटरची छोटी बॅटरीही काही हजार रुपयांत येते. यावरून इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीच्या किमतीचा अंदाज लावता येतो. म्हणूनच इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना त्याची बॅटरी तपासणं फार महत्वाचं आहे. जेणेकरून वॉरंटीच्या आत ती बदलता येते. 


...त्यामुळे बॅटरी लवकर खराब होते



  • खूप उष्णता किंवा खूप थंडी कारच्या बॅटरीवर वाईट परिणाम करते.

  • कार कधीही पूर्णपणे चार्ज करू नका किंवा पूर्णपणे डिस्चार्ज करू नका.

  • 100 टक्के पर्यंत बॅटरी चार्ज करणे टाळा.

  • तज्ञांच्या मते, बॅटरीची पातळी 20 टक्के ते 80 टक्क्यांच्या दरम्यान ठेवणे योग्य मानले जाते.

  • कार नेहमी फास्ट चार्जरने चार्ज करू नये, यामुळे बॅटरीची शेल्फ लाईफ कमी होते.

  • हिवाळ्यात इलेक्ट्रिक वाहनं मोकळ्या ठिकाणी पार्क करणे टाळा.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sushmita Sen : अभिनेत्री सुष्मिता सेनने खरेदी केली New Mercedes Benz कार; कारचा लूक आणि किंमत पाहून तुम्हीही थक्क व्हाल


Car loan Information:

Calculate Car Loan EMI