Ferrari To Launch 15 New Cars: आपल्या सुपर कारसाठी (Super Cars) प्रसिद्ध असलेली इटालियन कंपनी फेरारीने 2026 पर्यंत सुमारे 15 नवीन वाहने बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. कंपनी सर्वातआधी आपली इलेक्ट्रिक कार सादर करू शकते. तर या सर्वांव्यतिरिक्त, Icona सीरीज कार आणि नवीन रेंज-टॉपिंग सुपरकार देखील लॉन्च केली जाऊ शकते. सध्या कंपनी फेरारी आयसी मॉडेल सादर करण्याच्या तयारीत आहे.
फेरारीला अंदाजे 60 टक्के मॉडेल्स सर्व-इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड पर्यायांसह येण्याची अपेक्षा आहे. कंपनीने सांगितले की 2030 पर्यंत त्यांचे 'पारंपारिक' इंजिन मॉडेल्स केवळ 20 टक्के कमी केले जातील. फेरारीने हायपरकारबद्दल कोणतेही तपशील जारी केलेले नाहीत. यादरम्यान 40 टक्के कार हायब्रीड आणि 40 टक्के कार इलेक्ट्रिक इंजिन तंत्रज्ञानाने बनवल्या जातील.
कंपनीने पुष्टी केली आहे की, फेरारी ले मॅन्स पुन्हा सादर करणार आहे. कंपनीने नुकताच हायपरकारचा एक टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये मध्यभागी लाल पट्टी असलेली स्लिम एलईडी लाइटिंग सिस्टीम असलेली हायपरकार दाखवण्यात आली आहे. फेरारी हायपरकार ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम ऑफर करते. याला हायब्रिड पॉवरट्रेन देखील मिळू शकते.
4.6 अब्ज डॉलरची गुंतवणूक
हायब्रीड आणि इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून फेरारी ऑटोमोटिव्ह जगात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या बदलांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे. कंपनीने सांगितलं आहे की, ते पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि प्लग-इन हायब्रिड मॉडेल्स विकसित करण्यासाठी अंदाजे 4.4 अब्ज युरो किंवा 4.6 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार. कंपनीचे सीईओ बेनेडेटो विग्ना यांनी विद्युतीकरणाचा अवलंब करण्याच्या धोरणावर विश्वास दाखवला आहे. त्यांना विद्युतीकरणासाठी आवश्यक असलेल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्याचे काम देण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
- Maruti Suzuki : मारुती सुझुकीच्या गाड्यांची रेल्वेतून वाहतूक, तब्बल 17.4 कोटी लिटर तेलाची बचत
- मारुती सुझुकी या वर्षी लाँच करणार 'या' 3 नवीन कार, मिळणार जबरदस्त फीचर्स
- Hyundai लवकरच लॉन्च करणार आपली जबरदस्त Stargazer कार, Ertiga-Carens शी होणार स्पर्धा
Car loan Information:
Calculate Car Loan EMI