Evolet Pony Ez: भारतात इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. मात्र जास्त किंमतीमुळे इलेक्ट्रिक वाहने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. जर तुम्हीही असा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सांगत आहोत, जी तुमच्या बजेटमध्ये आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही स्मार्टफोनच्या किमतीत खरेदी करू शकता. चला तर या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल अधिक माहिती अजनून घेऊ.


या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहे Evolet Pony EZ. ही स्कूटर तुमच्या स्मार्टफोनच्या किंमतीत तुम्ही खरेदी करू शकता. Evolet Pony EZ ई-स्कूटरची बाजारात किंमत फक्त 39,499 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत Samsung Galaxy Note 10 Lite स्मार्टफोन इतकीच आहे.


मिळणार वॉटरप्रूफ मोटर 


या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वॉटरप्रूफ BLDC मोटर आहे. ही मोटर 250 वॅट पॉवर देते. पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 90-120 किलोमीटर धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. या स्कूटरची  टॉप स्पीड 25 किमी/तास आहे.


चांगल्या प्रकारे हाताळता यावी म्हणून  Evolet Pony EZ च्या पुढील बाजूस डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक  देण्यात आला आहे. कंपनीने ही स्कूटर दोन बॅटरी प्रकारांमध्ये सादर केली आहे. यात लीड ऍसिड आणि लिथियम-आयन बॅटरीचा समावेश आहे. याच्या लीड ऍसिड मॉडेलला पूर्ण चार्ज होण्यासाठी 8-9 तास लागतात. तर लिथियम आयन मॉडेलला पूर्ण चार्ज होण्यासाठी 3-4 तास लागतात.  ही स्कूटर फक्त 6 पैशांमध्ये 1 किमी पर्यंत धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने ही स्कूटर रेड, व्हाईट, ब्लॅक आणि सिल्व्हर अशा एकूण चार रंगांमध्ये सादर केली आहे.


कंपनी आपल्या स्कूटरच्या बॅटरीवर 1 वर्षाची आणि मोटरवर 18 महिन्यांची वॉरंटी देत ​​आहे. Evolet Pony EZ ही एक छोटी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ज्यामुळे सर्व वयोगटातील लोक सहजपणे ती चालवू शकतात. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच गृहिणी यांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनीने ही स्कूटर डिझाइन केली आहे. या स्कूटरचे वजन 90 किलोग्रॅम आहे आणि तिची लोडिंग क्षमता 150 किलो इतकी आहे.


इतर ऑटो संबंधित बातम्या: 


Rolls Royce Phantom: सौदी अरेबिया सरकार सर्व फुटबॉलपटूंना देणार रोल्स रॉयस फॅंटम, किंमत 11 कोटी रुपये
   


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI