2022 FIFA World Cup : सध्या कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक 2022 मध्ये अनेक संघांमध्ये मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. ज्यामध्ये सर्वात धक्कादायक निकाल अर्जेंटिना आणि सौदी अरेबिया यांच्यात झालेल्या सामन्यात पाहायला मिळाला आहे. अर्जेंटिना हा दोन वेळा विश्वविजेता ठरला आहे. अशा बलाढ्य संघाचा सौदी अरेबिया संघाने 2-1 असा पराभव केला आहे. या मोठ्या सामन्याची जगभरात जोरदार चर्चा आहे. यासोबतच विजेत्या संघाचे अभिनंदनही केले जात आहे. अशातच आता सौदी अरेबिया येथील स्थानिक मीडियानुसार, सौदी अरेबिया सरकार आपल्या देशाच्या संघाच्या कामगिरीवर खूश असून संघातील प्रत्येक खेळाडूला रोल्स रॉयस फॅंटम कार देणार आहे.
एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद स्वतः कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपमधून परतल्यानंतर संघातील सर्व खेळाडूंना ही रोल्स रॉयस कार बक्षीस देणार आहेत. फीफा विश्वचषकात मिळवलेल्या या विजयामुळे सध्या सौदी अरेबियामध्ये जल्लोषाचे वातावरण असून या आनंदाच्या निमित्ताने तेथील राजाने सुट्टी जाहीर केली होती. अर्जेंटिनाविरुद्धच्या या विजयाची कोणालाच अपेक्षा नव्हती. कारण अर्जेंटिना हा दोन वेळा फिफा विश्वचषक विजेता ठरला आहे. तसेच तो या विश्वचषकाचा प्रबळ दावेदारही आहे. सौदी अरेबिया आणि अर्जेंटिना यांच्या संघांमध्ये सध्या 48 रँकचा फरक आहे आणि अर्जेंटिना संघात लिओनेल मेस्सीसारखे दिग्गज खेळाडूही आहेत.
Rolls-Royce Phantom ची काय आहे खास गोष्ट?
Rolls-Royce Phantom ची गणना कंपनीच्या जगातील सर्वात लोकप्रिय आणि लक्झरी कारमध्ये केली जाते. भारतात या कारची सध्याची किंमत सुमारे 11 कोटी रुपये आहे. ही कार रोल्स रॉयसने या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केली होती. कारमध्ये 6.75-L Naturally-Aspirated V12 इंजिन देण्यात आले आहे. जे 555 bhp कमाल पॉवर आणि 900 Nm पीक टॉर्क जनरते करते. हे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. या कारमध्ये रियर व्हील ड्राइव्ह सिस्टिम उपलब्ध आहे. ही कार इतकी पॉवरफुल आहे की, 0-100 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी या कारला फक्त 5.1 सेकंद लागतात.
इतर महत्वाच्या बातम्या:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI