Honda Electric Scooter : भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Scooter) वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. याचं मुख्य कारण म्हणजे ही वाहने चालविण्यास सोपी आणि स्वस्त परवडणारी असतात. याच इलेक्ट्रिक कारचा वाढता वापर लक्षात घेता होंंडा मोटारसायकल सुद्धा लवकरच भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन येणार आहे. 2023 पर्यंत ही इलेक्ट्रिक स्कूट भारतात लॉन्च होणार आहे. या स्कूटरची आणखी वैशिष्ट्ये कोणती ते जाणून घेऊयात.   


2023 पर्यंत होणार लॉन्च 


HMSI आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी जपानच्या सहकार्याने काम करेल. आणि 2023 च्या सुरुवातीला कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर देशात लॉन्च करणार आहे. ही स्कूटर देशातील TVS I Cube, Ola S1 Pro, Ather 450X सारख्या स्कूटरशी स्पर्धा करणार आहे. 


होंडा जपानी अभियंत्यांची मदत घेणार 


Honda आपल्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्कूटर Activa चे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करू शकते. त्यासाठी कंपनी जपानी अभियंत्यांचे सहकार्य घेणार आहे. जे मेड फॉर इंडिया अंतर्गत यासाठी पॉवरट्रेन, प्लॅटफॉर्म आणि इतर तंत्रज्ञान विकसित करेल. 


सर्वाधिक विक्री होणारी Honda Activa स्कूटर


Honda च्या Activa स्कूटर ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे, तिचे प्रतिस्पर्धी TVS Jupiter आणि Hero Maestro Edge विक्रीच्या बाबतीत खूप मागे आहेत. इलेक्ट्रिक स्कूटरकडे लोकांचा वाढता कल लक्षात घेऊन कंपनी याकडे अधिक लक्ष देत आहे. कंपनीने याबाबत अद्याप उघडपणे काहीही सांगितलेले नाही, पण आशा आहे की Honda ची इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450X आणि TVS I Cube शी टक्कर देऊ शकते.


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI