Ola Lithium Ion Battery: ओला इलेक्ट्रिक लवकरच भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी सेलचे उत्पादन सुरू करण्याचा विचार करत आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने खुलासा केला आहे की, भारतात सेलचे उत्पादन सुरू झाल्यानंतर ओला आपल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती 25-30 टक्क्यांनी कमी करू शकेल. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणार्‍या बॅटरी पॅकची किंमत 40 टक्क्यांनी कमी होऊ शकते.


सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहने तयार करणाऱ्या कंपन्या बैटरीसाठी चीन, तैवान आणि जपान सारख्या देशांवर अवलंबून आहेत. बॅटरीच्या आयातीमुळे इलेक्ट्रिक वाहनांची किंमत वाढते. त्याचबरोबर बॅटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या इतर उपकरणांचे उत्पादन भारतातच सुरू झाले आहे. Ola सध्या LG Chem कडून इलेक्ट्रिक वाहनांची विक्री खरेदी करत आहे.


सध्या भारतात बॅटरीचे उत्पादन होत नसल्यामुळे, इलेक्ट्रिक वाहनांची किंमत जास्त आहे. ज्यामुळे बाजारात ई-वाहनांच्या किंमती पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा जास्त आहेत. यामुळे देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या विकासात अडथळे येत आहेत. इकॉनॉमिक टाईम्स ऑटोने ओलाच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, ओला आपल्या प्लांटमध्ये तयार केलेल्या बॅटरी पॅकचा वापर आपल्या दुचाकींमध्ये करेल. बॅटरी पॅक निर्यात करण्याची कंपनीची योजना आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण झाल्यानंतरच निर्यात सुरू होईल.


मिळालेल्या माहितीनुसार, ओला आधी आपल्या इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी करण्याचा आणि ते अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. ओलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ई-वाहनांच्या निर्मितीचा खर्च कमी असेल तर कंपन्या त्यांना सुरक्षित बनवण्यासाठी अधिक गुंतवणूक करू शकतील. यामुळे भविष्यात प्रत्येक ग्राहकाला परवडणारे इलेक्ट्रिक वाहन मिळू शकेल.


दरम्यान, ओलाने गेल्या महिन्यातच त्यांच्या विक्रीचे आकडे जाहीर केले होते. कंपनीने आपल्या फ्युचर फॅक्टरीत बॅटरी इनोव्हेशन सेंटरची स्थापना केली आहे. ज्यामध्ये तज्ञ बॅटरीच्या डिझाइनसाठी काम करत आहेत. Ola चे संस्थापक, भाविश अग्रवाल म्हणाले होते की त्यांनी या बॅटरी इनोव्हेशन सेंटरच्या उभारणीसाठी 500 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. हे जगातील सर्वात मोठे अत्याधुनिक इनोव्हेशन सेंटर आहे.


महत्वाच्या बातम्या : 



 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI