Electric cars : जगभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric cars ) उत्पादनात आणि वापरात वाढ होत आहे. वाढते इंधन दर आणि प्रदूषणामुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. 2021 मध्ये नॉर्वेत (Norway) झालेल्या वाहन विक्रीपैकी दोन तृतीयांश इलेक्ट्रिक कारची विक्री झाली आहे. यामध्ये टेस्ला कंपनीच्या (Tesla cars) सर्वाधिक कारचा समावेश आहे.
नॉर्वेमध्ये 5.4 मिलीयन लोक इलेक्ट्रिक कारचा वापर करतात. त्यामुळे जगात सर्वात जास्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यात नॉर्वेचा प्रथम क्रमांक लागतो. त्याखालोखाल चीनमध्ये 1.4 मिलीयन लोक इलेक्ट्रिक कारचा वापर करतात.
नॉर्वे देशात इलेक्ट्रिक वाहनांना (BEVs) करातून सूट देऊन इलेक्ट्रिक वाहन वापर वाढवण्यास चालना दिली जात आहे. 2022 मध्ये 80 टक्के इलेक्ट्रिक कारचा वापर करण्यासह 2025 पर्यंत इंधनावर चालणाऱ्या वाहनांची विक्री बंद करण्याचे नॉर्वेचे उद्दिष्ट आहे.
नॉर्वेत 2021 मध्ये कारच्या विक्रीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2021 मध्ये नॉर्वेत 176,276 कारची विक्री झाली आहे. यातील 65 टक्के इलेक्ट्रिक कार आहेत. 2020 पेक्षा 54 टक्क्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केट नॉर्वेत वाढले आहे.
नॉर्वेत 2021 मध्ये विक्री झालेल्या कारमध्ये टेस्ला (Tesla) च्या 11.6 टक्के कार आहेत. तर जर्मनीस्थित कंपनी फॉक्सवॅगनच्या 9.6 टक्के कार आहेत.
2021 मध्ये टेस्लाचे मॉडेल 3 हे नॉर्वेमध्ये सर्वाधिक पसंतीचे ठरले आहे. टोयोटाच्या (7203.T) RAV4 पेक्षा जास्त विक्री ही टेस्लाच्या मॉडेल 3 ची झाली आहे. 2021 मध्ये फोक्सवॅगनच्या (VOWG_p.DE) इलेक्ट्रिक आयडी 4 या कारची नॉर्वेत तीन नंबरला विक्री झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Electric Scooter: Okaya Faast इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, किंमत घ्या जाणून
- Car Launches in 2021: दमदार फिचर्स, किंमत 10 लाखांपेक्षा कमी; 2021 मध्ये 'या' जबरदस्त कार लॉन्च
- Car Insurance Premium कसा ठेवाल कमी, कार बजेटशी संबंधित जाणून घ्या या गोष्टी
Car loan Information:
Calculate Car Loan EMI