Car Inssurance Tips : अनेकांच्या कार विम्याचे नुतनीकरण करण्याची तारीख जवळ आली असेल. कार विमा नुतनीकरण करताना तुम्ही प्रीमियमवरील काही रक्कम वाचवू शकता. जाणून घ्या या काही टिप्स 



क्रेडिट स्कोअरवर ठेवा लक्ष 


कर्ज घेताना किंवा क्रेडिट कार्ड इत्यादी घेताना सामान्यतः क्रेडिट स्कोअर वापरला जातो. परंतु सध्या काही कार विमा कंपन्यादेखील कारचा प्रीमियम किंवा नूतनीकरणाची रक्कम ठरवण्यासाठी वापरत आहेत. यामुळे, तुमचा क्रेडिट स्कोअर कधीही 750 च्या खाली जाऊ नये याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. CIBIL स्कोअर 750 हा एक चांगला स्कोअर मानला जातो. जो कर्ज व इतर लाभ घेण्यासाठी देखील मानक मानला जातो.


तुमची कार किती धावते?


तुमची कार रस्त्यावर जितकी जास्त वेळ धावणार तितके जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जर क्वचितच कार वापरणारे असाल, तर तुम्ही तुमच्या कारच्या विम्याचे नूतनीकरण करताना ही माहिती द्यावी. विम्याची रक्कम काही प्रमाणात कमी होऊ शकते. मात्र, याबाबत प्रत्येक विमा कंपन्याचे धोरण याबाबत वेगवेगळे आहे. 


लक्झरी/एसयूव्ही किंवा प्रवासी कारसाठी विम्याची रक्कम भिन्न असू शकते 


नवीन कार चोरीला जाण्याचा धोकाही जास्त असतो, त्यामुळे जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल, तर विमा कंपनीकडे किंवा पॉलिसी बाजार सारख्या साइटवर जाऊन, नवीन कारचा प्रीमियम दर किती असू शकतो हे आधीच जाणून घ्या. त्याशिवाय अपघातानंतर नवीन कारच्या दुरुस्तीसाठी जास्त खर्च येतो. तर जुन्या कारच्या नूतनीकरणासाठी कमी खर्च येतो. या आधारावर विम्याची रक्कमही वाढू शकते किंवा कमी होऊ शकते.


कार चालकाचा अनुभव, वयदेखील महत्त्वाचे


कार चालक कसा आहे, नवीन आहे अथवा अप्रशिक्षित, कुशल आदी बाबीदेखील कार विम्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. जर तुम्ही ड्रायव्हर ठेवला असेल, तर कारसाठी सर्वात सुरक्षित ड्रायव्हर शोधा. ज्यामुळे तुमच्या कारचे नुकसान कमी होईल आणि कमी खर्चात या आधारावर विमाही नूतनीकरण करता येईल.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI