Electric Bikes Under 4 lakhs : इलेक्ट्रिक बाईक पेट्रोलवर चालणाऱ्या (Electric Bike)  मोटारसायकल बाईकर्सला आकर्षित करत असून अनेक कंपन्यांनी या सेगमेंटमध्ये चांगल्या बाईक्स उपलब्ध आहेत. जे लोक इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही बातमी आहे.  कोणत्या चांगल्या इलेक्ट्रिक मोटारसायकल 1 लाख ते 2 लाख रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे आणि ज्यांचे बजेट दोन लाखांपेक्षा जास्त असेल, त्यांच्याकडे कोणते पर्याय आहेत? पाहूयात...

Continues below advertisement

Revolt RV 400 BRZ : रिव्होल्ट मोटर्सच्या या नव्या इलेक्ट्रिक मोटारसायकलची एक्स-शोरूम किंमत 1.38 लाख रुपये आहे. ही मोटारसायकल 5 कलर ऑप्शनमध्ये येते आणि सिंगल चार्जवर 150 किमीपर्यंत रेंज देते. लुक आणि फीचर्समध्येही हे चांगलं आहे.

Tork Kratos R : टॉर्क मोटर्सच्या या इलेक्ट्रिक मोटारसायकलची किंमत 1.67 लाख रुपये आहे. सिंगल चार्जवर याची रेंज 180 किमी पर्यंत आहे आणि टॉप स्पीड 105 किमी प्रति तास आहे.

Continues below advertisement

Oben Roar : बेंगळुरूस्थित ईव्ही कंपनी ओबेनच्या इलेक्ट्रिक मोटारसायकलची एक्स-शोरूम किंमत 1.49 लाख रुपये आहे. याची सिंगल चार्ज रेंज 200 किमी पर्यंत आणि टॉप स्पीड 100 किमी प्रति तास आहे.

Matter Era: मॅटर एरा इलेक्ट्रिक बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.73 लाख रुपये असून याची बॅटरी सिंगल चार्जवर 125 किलोमीटरपर्यंत धावू शकते.

Komaki Ranger : या इलेक्ट्रिक क्रूझर बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.85 लाख रुपये असून याची सिंगल चार्ज रेंज 250 किलोमीटरपर्यंत आहे.

Switch CSR 762 : या इलेक्ट्रिक बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.89 लाख रुपये असून याची सिंगल चार्ज रेंज 160 किमी आणि टॉप स्पीड 110 किमी प्रति तास आहे.

Kabira Mobility KM 3000RS: या इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत 1.62 लाख रुपये आहे. उर्वरित सिंगल चार्ज रेंज 120 किमी पर्यंत आहे आणि टॉप स्पीड 100 किमी प्रति तास आहे.

One Electric Motorcycle Crideon : वन इलेक्ट्रिकच्या या ई-मोटरसायकलची एक्स शोरूम किंमत 1.35 लाख रुपये आहे. याची बॅटरी रेंज 110 किलोमीटर पर्यंत आणि टॉप स्पीड 95 किमी प्रति तास आहे.

Ultraviolette F77: या दमदार इलेक्ट्रिक मोटारसायकलची एक्स-शोरूम किंमत 3.80लाख रुपये आहे. याची सिंगल चार्ज रेंज 307 किमी पर्यंत आणि टॉप स्पीड 140 किमी प्रति तास आहे.

Orxa Mantis: या इलेक्ट्रिक मोटारसायकलची किंमत 3.60  लाख रुपये आहे. गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या या बाईकची सिंगल चार्ज बॅटरी रेंज 211किमी पर्यंत आणि टॉप स्पीड 135किमी प्रति तास आहे.

इतर महत्वाची बातमी-

Citroen C3 Aircross Automatic : Citroen C3 Aircross Automatic ची बुकिंग सुरु, विक्री कधीपासून सुरु होणार?

 
 
 

Car loan Information:

Calculate Car Loan EMI