Citroen C3 Aircross Automatic : Citroen C3 Aircross Automatic कारची पुढील आठवड्यापासून विक्री सुरु होणार आहे. कंपनीने याची (Auto News) बुकिंग 25 हजार रुपयांत सुरू केली आहे. त्याचबरोबर येत्या काही महिन्यांत त्याची डिलिव्हरीही सुरू होण्याची शक्यता आहे. ही कार ऑटोमॅटिक असल्यामुळे या कारला चांगली मागणी आहे. 


किंमत  किती असेल?


किंमतीच्या बाबतीत C 3 एअरक्रॉस ऑटोमॅटिक त्याच्या मॅन्युअल-गिअरबॉक्स व्हेरिएंटपेक्षा सुमारे 1 लाख रुपये महाग असेल.साधारण याकारची किंमत 9 ते 12 लाखांपर्यंत असू शकते. तर त्याच्या एंट्री लेव्हल व्हेरियंटच्या किंमती बाकी या फिचर असलेल्या कारपेक्षा कमी असू शकतात. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळाल्यानंतर सिट्रॉन त्या ग्राहकांना स्वत:कडे आकर्षित करु शकणार आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या एसयूव्हीच्या शोधात असलेल्यांना C3 एअरक्रॉस ही कार चांगला पर्याय असणार आहे.


कसे आहेत फिचर्स?


-सिट्रॉन सी3 एअरक्रॉस ऑटोमॅटिक मॅक्स आणि प्लस या दोन ट्रिम्समध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 
-या एसयूव्हीमध्ये अनेक नवे फिचर्स असण्याची शक्यता आहे. अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले 10 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे.
-आवश्यक ड्रायव्हिंग माहिती  देणारा सात इंचाचा टीएफटी क्लस्टर देण्यात आला आहे.
-यूएसबी चार्जिंग सॉकेट, डायनॅमिक guidelines, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, रूफ रेल, रिमोट इंजिन स्टार्ट, रियर वायपर आणि बरेच काही यासारखे अॅडव्हान्स फिचर्स आहेत.


भारतासाठी सी 3 एअरक्रॉस ऑटोमॅटिक सध्या इंडोनेशियात विकल्या जाणाऱ्या मॉडेलप्रमाणेच राहणार आहे, ज्यात प्रसिद्ध जपानी ट्रान्समिशन निर्माता आयसिनकडून 6-स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. या एसयूव्हीमध्ये मॅन्युअल व्हेरियंटमध्ये मिळणारे 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असणार आहे. ऑटोमॅटिक व्हेरियंटचे पॉवर आणि टॉर्क आउटपुट  अजून जाहीर करण्यात आलेलं नाही.


Citroen C3 Aircross Automatic कोणत्या कारला देणार टक्कर?



Citroen C3 Aircross Automatic भारतात मध्यम आकाराच्या एसयूव्हीच्या सेगमेंटमध्ये एन्ट्री करणार आहे.  ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, फोक्सवॅगन Taigun, स्कोडा कुशाक, टोयोटा हायडर आणि मारुती सुझुकी ग्रँड विटारा या कारला ही Citroen C3 Aircross Automatic टक्कर देण्याची शक्यता आहे. येत्या काळात ऑटोमॅटिक कारची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे  चालवायला सोपी असलेल्या अॅटोमॅटिक कार विकत घ्यायचा विचार करत असाल तर ही कार तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकते.


इतर महत्वाची बातमी-


Mercedes Benz: अपडेटेड मर्सिडीज GLA SUV आणि AMG GLE 53 Coupe 31 जानेवारीला लाँच होणार, जाणून घ्या किंमत किती असेल?


 

 

 

 

Car loan Information:

Calculate Car Loan EMI