Mercedes Benz AMG GLE 53 Facelift Launch :  मर्सिडीज-बेंझने आपल्या  (Mercedes-Benz)  अपडेटेड GLA एसयूव्ही आणि AMG GLE 53 Coupe भारतात लाँच करण्याची तारीख जाहीर केली आहे. या कार 31 जानेवारी 2024 रोजी लाँच करण्यात येणार आहेत. दिल्लीत होणाऱ्या लाँचिंग इव्हेंटमध्ये दोन्ही मॉडेल्सच्या किंमती जाहीर केल्या जातील. 2024 मर्सिडीज-बेंझ जीएलए आणि  AMG GLE 53  Coupe फेसलिफ्ट्समध्ये प्री-फेसलिफ्ट व्हेरियंटचे इंजिन सेटअप कायम ठेवला असून काही किरकोळ स्टायलिंग अपडेट ्स आणि काही अॅडव्हान्स फिचर्स असतील. 


डिझाइन कसं असेल?



जीएलएवरील बहुतेक कॉस्मेटिक अपडेट्स फ्रंटवर केले जातील. ज्यात रिडिझाइन केलेले ग्रिल, नवीन एलईडी हेडलॅम्प्स आणि अद्ययावत बंपर चा समावेश आहे. व्हील आर्चरील प्लॅस्टिक ट्रिम आणि अपडेटेड रिअर बंपर एसयूव्हीला फ्रेश लुक देईल. 2024 मर्सिडीज-बेंझ GLAफेसलिफ्टच्या इंटिरियरमध्ये अॅडव्हान्सएमबीयूएक्स इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह एम्बियंट लाइटिंग सिस्टम मिळेल. मर्सिडीज-बेंझ एएमजी जीएलई 53 कूप आणि जीएलएच्या डिझाइनमध्ये समान बदल होण्याची शक्यता आहे.



फिचर्स कसे असतील?


नवीन जीएलए सध्याच्या 1.3 लीटर टर्बो पेट्रोल आणि 2.0 एल डिझेल इंजिनसह सुरू राहील. जे 163bhp  आणि 190 bhpचे पॉवर जनरेट करते. जीएलई 53 कूपमध्ये स्लॉप रूफ सह 3.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि   48V माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजी मिळेल. हा सेटअप 429bhp जनरेट करतो. ही स्पोर्ट्स कूप-एसयूव्ही 9-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि मर्सिडीज-बेंझची 4 एमएटी सिस्टम असेल. सध्याच्या मॉडेलप्रमाणेच 5.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडण्याचा अंदाज आहे.


किंमत कितीने वाढणार?


किंमतीच्या बाबतीत, 2024 मर्सिडीज-बेंझ जीएलएच्या बेस व्हेरिएंटची किंमत बेस व्हेरिएंटसाठी सुमारे 45 लाख रुपयांवरून 49 लाख रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मर्सिडीज-एएमजी जीएलई 53 Coupe ची किंमत सुमारे 1.3 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.


 सध्या सगळीकडे आलिशान कारची चर्चा सुरु आहे.  किंमत जरी जास्त असली तरी फिचर्सदेखील चांगले अपडेट करण्यात आले आहेत. आलिशान कार आवडणाऱ्यांसाठी ही कार चांगला पर्याय आहे. शिवाय माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीदेखील मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर लक्झरी आणि आलिशान कारच्या शोधात असाल तर ही कार नक्की खरेदी करु शकता. 


इतर महत्वाची बातमी-



 

 

Car loan Information:

Calculate Car Loan EMI