Virtus Motors Alpha Electric Bicycle: देशातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी, Virtus Motors नं आज देशांतर्गत बाजारात इलेक्ट्रिक सायकलची  (Electric Bicycle) नवी अल्फा सीरिज ( Alpha Electric Bicycle ) लॉन्च केली आहे. यामध्ये 'Alpha A' आणि 'Alpha I' अशा दोन इलेक्ट्रिक सायकल लॉन्च करण्यात आल्या आहेत. कंपनीचा दावा आहे की, या नवीन सीरिजमुळे पारंपारिक आणि इलेक्ट्रिक सायकलमधील (Electric Cycle) अंतर भरून काढण्यास मदत होईल.             


Alpha सीरिजची वैशिष्ट्य


दोन्ही इलेक्ट्रिक सायकल्समध्ये 8.0 Ah क्षमतेचा फिक्स्ड बॅटरी पॅक देण्यात आला आहे. याच्या समोरील बाजूस डिस्क ब्रेक मिळतो आणि कंपनीचा दावा आहे की, त्यांची सिंगल-स्पीड डिझाइन सर्व प्रकारच्या रस्त्यांवर कोणत्याही अडथळ्याशिवाय चालते. या सायकल्समध्ये अनेक यूजर फ्रेंडली फिचर्स देण्यात आले आहेत, जे या सायकलची क्षमता आणखी वाढवतात. याला 1-इंच एलसीडी स्क्रीन मिळते, जी थ्रॉटलजवळ लावण्यात आली आहे. या डिस्प्लेवर तुम्हाला रिअल टाईम माहिती मिळते.


बॅटरी आणि परफॉर्मन्स


या इलेक्ट्रिक सायकलमध्ये कंपनीनं 250W क्षमतेची इलेक्ट्रिक हब मोटर दिली आहे, जी 36V 8AH बॅटरी पॅकनं सुसज्ज आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर, ही सायकल 30 किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते, तर पेडल सपोर्टसह, ही रेंज 60 किमीपर्यंत वाढते. या सायकलचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे आणि वजन फक्त 20 किलो आहे. ट्यूब टायर, पुढील आणि मागील डिस्क ब्रेकसह सुसज्ज असलेल्या या सायकलमध्ये MTB फ्रेम आणि इनबिल्ट बॅटरी पॅक आहे. बॅटरी लेव्हल, ओडोमीटर, स्पीडोमीटर अशी माहिती सायकलच्या डिस्प्लेमध्ये उपलब्ध आहे.


किंमत आणि व्हेरियंट्स 


कंपनीनं आपल्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त या सायकल लाँच केल्या आहेत. त्यामुळे कंपनी याला खास किंमतीत ऑफर करत आहे. त्याची मूळ किंमत 24,999 रुपये आहे, परंतु पहिल्या 50 ग्राहकांना ही सायकल केवळ 15,999 रुपयांमध्ये मिळेल. यानंतर, पुढील 100 ग्राहकांसाठी 17,999 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. तसेच, विशेष सूट कालावधी दरम्यान, ही सायकल 19,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. ही सायकल दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये राखाडी आणि निळा या रंगांचा समावेश आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून या इलेक्ट्रिक सायकल्स तुम्ही बुक करु शकता.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


महिंद्राची नवी 9-सीटर बोलेरो निओ प्लस; पॉवर अन् परफॉर्मन्सचं जबरदस्त कॉम्बिनेशन!


Car loan Information:

Calculate Car Loan EMI