Diwali Discount Offers On Cars: सणासुदीच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात लोक वाहन खरेदी करतात. म्हणून अनेक वाहन कंपन्या सणासुदीच्या काळात आपले वाहन लॉन्च करतात. यातच नवरात्रीत मोठ्या प्रमाणात वाहन विक्री झाली आहे. यात चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. हाच ट्रेंड पुढे दिवाळीतही सुरु राहणार अशी अपेक्षा कार निर्मात्यांना आहे. दिवाळीत धनत्रयोदशी (Dhantrayodashi) दिवशी मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी होते. हेच लक्षात घेऊन अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या वाहनांवर मोठी डिस्काउंट देत आहेत. चला तर मग जाणून कोणत्या गाडीला मिळतंय किती डिस्काउंट.


Maruti Celerio: या कारची प्रारंभिक  एक्स-शोरूम किंमत 5.25 लाख रुपये आहे. जी याच्या टॉप स्पेस मॉडेलसाठी 7 लाख रुपयांपर्यंत जाते. यावर 59,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे.


Maruti Alto K10: मारुतीच्या नुकत्याच लॉन्च झालेल्या या कारची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख ते 5.83 लाख रुपये आहे. या कारवर 39,000 रुपयांची सवलत उपलब्ध आहे.


Maruti Swift: या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपये आहे, तर तिचे टॉप मॉडेल 8.71 लाख रुपये आहे. या कारच्या खरेदीवर 50,000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.


Maruti Ignis: या कारची एक्स-शोरूम किंमत 5.35 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.72 लाख रुपयांपर्यंत जाते. मारुती इग्निसच्या खरेदीवर या महिन्यात 30,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.


Maruti Wagon R: मारुती वॅगनआरची एक्स-शोरूम किंमत 5.48 लाख ते 7.08 लाख रुपये आहे. या कारवर 40,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे.


Renault Kwid: या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.64 लाख रुपये आहे जी 5.99 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारच्या खरेदीवर 35,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.


Renault Triber: Renault Triber MPV ची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारच्या खरेदीवर 50,000 डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे.


Honda City: या कारची एक्स-शोरूम किंमत 11.57 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 15.52 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारच्या खरेदीवर कोणीही 37,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतो.


Tata Safari & Harrier: या दोन्ही कारवर ग्राहक या महिन्यात 45,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. हॅरियरची एक्स-शोरूम किंमत 14.70 लाख ते 22.20 लाख रुपये आणि सफारीची एक्स-शोरूम किंमत 15.35 लाख ते 23.56 लाख रुपये आहे.


Hyundai Grand i10 Nios आणि Aura: या दोन्ही कारवर 33,000 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते. Grand i10 Nios बाजारात 5.43 लाख ते 8.45 लाख रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे. तर Aura ची एक्स-शोरूम किंमत 6.09 लाख ते 8.87 लाख रुपये आहे.


 


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI