Tata Tiago EV Booking: देशातली आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने अलीकडेच आपली नवीन इलेक्ट्रिक हॅचबॅक टियागो लॉन्च केली होती. टाटाच्या इलेक्ट्रिक कारची गेल्या अनेक महिन्यांपासून ग्राहक प्रतीक्षा करत होते. अशातच या कारच्या  लॉन्चिंगनंतर बुकिंग सुरु होताच ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. कंपनीने या कारची बुकिंग सुरु केल्यानंतर पहिल्याच दिवशी याच्या 10000 हुन अधिक युनिट्सची बुकिंग झाली आहे. कंपनीने 10 ऑक्टोबरपासून याची बुकिंग सुरु केली आहे. ही कार बुक करण्यासाठी ग्राहकांना 21,000 रुपये टोकन रक्कम भरावी लागेल. लॉन्चच्या वेळी घोषित करण्यात आलेल्या या कारची किंमत फक्त पहिल्या 10,000 बुकिंगसाठी होती.


याचे बुकिंग अजूनही सुरु आहे. ग्राहक ऑनलाइन पोर्टल किंवा डीलरशिपला भेट देऊन ही कार बुक करू शकतात. पहिल्या दिवशी ऑनलाइन पोर्टलद्वारे ही कार बुक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांनी वेबसाइट क्रॅश झाल्याची तक्रार केली. ज्यामुळे ते Tiago EV बुक करू शकले नाहीत. Tiago EV ऑक्टोबर 2022 पासून प्रमुख शहरांमधील प्रमुख मॉल्समध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. ग्राहकांसाठी टेस्ट ड्राइव्ह डिसेंबर 2022 च्या अखेरीस सुरू होईल आणि  याची डिलेव्हरी जानेवारी 2023 पासून सुरू होईल. 


आणखी 10,000 ग्राहकांना मिळणार प्रारंभिक किंमतीचा लाभ 


टाटा मोटर्सने याआधी या कारची किंमत केवळ 10,000 सुरुवातीच्या ग्राहकांसाठी कमी ठेवली होती. आता याच किंमतीत ही कार आणखी 10,000 ग्राहकांना मिळणार आहे. म्हणजेच आता बुकिंग केलेल्या पुढील दहा हजार ग्राहकांनाही कमी किमतीत कार खरेदी करता येणार आहे.


Tata Tiago EV बॅटरी 


Tata Tiago EV मध्ये 19.2kWh आणि 24KWh च्या दोन बॅटरी पॅकचा पर्याय मिळतो. ही कार 19.2kWh बॅटरी पॅकसह 60bhp पॉवर आणि 110Nm टॉर्क निर्माण करते. या बॅटरी पॅकसह ही कार 250km पर्यंतची रेंज देते.


फीचर्स 


ही नवीन इलेक्ट्रिक कार XE, XT, XZ+ आणि XZ+ टेक लक्स या चार प्रकारात लॉन्च करण्यात आली आहे. या कारमध्ये पुश बटण स्टार्ट/स्टॉप, क्रूझ कंट्रोल, केबिनमधील कनेक्टेड कार तंत्रज्ञान, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर पार्किंग सेन्सर्स, EBD सह ABS, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, रेन सेन्सिंग वायपर्स यांसारखी अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहे आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Tiago EV Review: Tata Tiago EV फर्स्ट लूक रिव्ह्यू, जाणून घ्या कशी आहे ही कार


Tata Tiago EV vs Tigor EV: टाटा टियागो आणि टाटा टिगोर या दोन इलेक्ट्रिक कारमध्ये कोणती आहे बेस्ट? जाणून घ्या


Car loan Information:

Calculate Car Loan EMI