Electric Scooters Discount Offers: नवीन वाहनं खरेदी करण्यासाठी आणि त्यांची विक्री वाढवण्यासाठी सणासुदीचा काळ (Festive Season) हा शुभ काळ मानला जातो, त्यामुळे वाहन (Vehicle) उत्पादक कंपन्याही या काळात आकर्षक सवलती (Special Discounts) देत ​​आहेत. इलेक्ट्रिक स्कूटरवरही मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. ओला, Ather, ivoomi या इलेक्ट्रिक स्कूटर्सवर विशेष डिस्काऊंट दिले जात आहेत, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...


ओला फेस्टिव्हल डिस्काऊंट


ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) आपल्या रेंजमधल्या कोणत्याही ई-स्कूटरवर 24,500 रुपयांपर्यंत खरेदीचा लाभ देत आहे. सध्या, ओला इलेक्ट्रिकच्या पोर्टफोलिओमध्ये S1X, S1 Air आणि S1 Pro या स्कूटर्सचा समावेश आहे. या ऑफर अंतर्गत नवीन Ola S1 Pro 2nd Gen वर 5 वर्षांच्या बॅटरी वॉरंटीसह 7,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे आणि S1 Air वर वॉरंटी वाढवण्यासाठी 50 टक्के सूट देण्यात येत आहे.


ओला इलेक्ट्रिक स्कूटरवर 10,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे, ज्याद्वारे ग्राहक कंपनीकडून पडताळणी केल्यानंतर त्यांची जुनी स्कूटर बदलून घेऊ शकतात. पार्टनरशिप क्रेडिट कार्डसह फ्लेक्सिबल ईएमआय ऑफरसाठी ओला इलेक्ट्रिक 7,500 रुपयांचे फायदे ग्राहकांना देत आहे. यामध्ये झिरो डाऊन पेमेंट, झिरो प्रोसेसिंग फी आणि 5.99 टक्के व्याजाचा समावेश आहे. एक रेफरल सिस्टम देखील आहे, जिथे रेफररला ओला ई-स्कूटर खरेदी केल्यानंतर रु. 1,000 कॅशबॅक मिळेल. दुसरीकडे, रेफररला मोफत Ola Care+ आणि 2,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळणार आहे.


एथर एनर्जी फेस्टिव्हल डिस्काऊंट


Ather Energy देखील आपल्या सर्व वाहनांवर सूट देत आहे. ज्यामध्ये 450, 450x 2.9kWh आणि 450x 3.7kWh चा समावेश आहे. कंपनी आपल्या सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर 450 वर 5,000 रुपयांची फ्लॅट फेस्टिव्ह बेनिफिट ऑफर देत आहे. यासोबतच ग्राहकांच्या जुन्या स्कूटरवर 1,500 रुपयांची कॉर्पोरेट ऑफर आणि 40,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही उपलब्ध करुन देत आहे.


सर्व फायद्यांसह 450s स्कूटर 86,050 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहेत, तसेच मिड-रेंज 450X 2.9 kWh 1,500 रुपयांच्या कॉर्पोरेट डीलसह आणि 40,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरसह उपलब्ध आहे. 450X ची किंमत 101,050 रुपये आहे, तर टॉप-ऑफ-द-लाईन 450X 3.7 kWh देखील 450X 2.9 kWh सारख्याच ऑफरसह उपलब्ध आहे आणि त्याची किंमत एक्स-शोरूम रुपये 110,249 आहे.


iVoomi फेस्टिव्हल डिस्काऊंट


iVoomi JETX आणि S1 क्रमश: 91,999 रुपये आणि 81,999 रुपयांच्या डिस्काऊंट दरात उपलब्ध आहे. तर JETX आणि S1 ची मूळ किंमत क्रमश: 99,999 आणि 84,999 रुपये आहे. यासोबतच कंपनी ग्राहकांना 10,000 रुपयांचे अतिरिक्त फायदेही देत आहे. ज्यामध्ये कंपनी सहाय्यक उपकरणं, हेल्मेट इ. याशिवाय iVoom RTO शुल्क देखील कव्हर करत आहे.


हेही वाचा:


Maruti Jimny Discount: मारुती जिम्नी खरेदी करण्याची उत्तम संधी; कंपनीकडून 1 लाखांपर्यंतचा भरघोस डिस्काऊंट


Car loan Information:

Calculate Car Loan EMI