Maruti Suzuki Jimny: सणासुदीच्या काळात विक्री वाढावी, याकरिता मोटर्स कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) देशभरातील त्यांच्या Nexa डीलरशिपवर जिम्नी लाईफस्टाईल SUV च्या एंट्री-लेव्हल झेटा व्हेरियंटवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट जाहीर केली आहे, यासोबत ग्राहकांना अनेक बेनिफिट्स देखील मिळणार आहेत. मारुती कंपनीची फेस्टिव्हल ऑफर मर्यादित काळासाठी असणार आहे.


करा 50 हजार रुपयांची बचत


मिळालेल्या माहितीनुसार, नेक्सा डीलर्स (Nexa Dealers) सुझुकी जिमनीच्या एंट्री-लेव्हल Zeta व्हेरिएंटवर 50 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहेत. याशिवाय लाईफस्टाईल SUV वर अतिरिक्त एक्सचेंज किंवा 50,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस देखील मिळणार आहे. Zeta व्हेरिएंटच्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही व्हेरिएंटवर या ऑफर देऊ करण्यात आल्या आहेत आणि ही ऑफर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंतच मर्यादित असणार आहे.


मारुती सुझुकी जिम्नी पॉवरट्रेन


जिम्नी (Jimny) हा मारुती सुझुकी झेटा लाईन-अपमधील एंट्री-लेव्हल व्हेरिएंट आहे. त्याच्या मॅन्युअल व्हर्जनची किंमत 12.74 लाख रुपये आहे, तर ऑटोमॅटिक व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 13.94 लाख रुपये आहे. या SUV ला 1.5-लीटर K15B पेट्रोल इंजिन मिळतं, जे 103bhp पॉवर आणि 134Nm टॉर्क जनरेट करतं. त्याच्या ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक समाविष्ट आहे. त्याचे ARAI प्रमाणित मायलेज मॅन्युअल व्हर्जनमध्ये 16.94kmpl आणि स्वयंचलित मॉडेलमध्ये 16.39kmpl आहे.


फिचर्स


ऑफ-रोडर सुझुकीच्या ऑलग्रिप प्रो 4×4 ड्राईव्हट्रेनसह कमी-रेंजच्या गिअरबॉक्ससह आणि स्टँडर्ड म्हणून 3-लिंक रिजिड एक्सल सस्पेंशनसह ही जिम्नी सुसज्ज आहे. या गाडीचा ब्रेकिंग अँगल 24° आहे. या एसयूव्हीचा ग्राउंड क्लीयरन्स 210 मिमी आणि वॉटर वेडिंग कॅपेसिटी 300 मिमी आहे.


या कारच्या केबिनमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्लेसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोल सारख्या अनेक शानदार फिचर्स मिळत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून यामध्ये सहा एअरबॅग, ABS, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP)आणि ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 12.74 लाख रुपये आहे.


मारुती सुझुकी जिम्नी (Maruti Suzuki Jimny) जूनमध्ये बाजारात दाखल झाली होती. मारुतीच्या या ऑफ-रोडिंग कारचा लूक खूपच पॉवरफुल आहे. यात एक मोठी ग्रील, मस्क्युलर बोनेट आणि गोल हेडलाइट्स फॉग लॅम्प, ब्लॅक आऊट बी-पिलर्स ओआरव्हीएम आणि अलॉय व्हील मिळतात.


हेही वाचा:


Tata Cars: टाटा कंपनीच्या 'या' कार खरेदीसाठी पैसे असूनही थांबावं लागणार, पाहा वेटिंग पीरियड


Car loan Information:

Calculate Car Loan EMI