How To Restart Car-Bike In Monsoon Season: पावसाळ्यात अनेकदा रस्त्यावर पाणी तुंबते. अशातच कार किंवा दुचाकीने प्रवास करणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. पावसामुळे पाणी साचल्याने कार आणि दुचाकीचे नुकसान होण्याची शक्यता सर्वाधिक असते. अशा स्थितीत वाहनाच्या इंजिनमध्ये पाणी जाण्याचाही धोका असतो. त्यामुळे वाहन बंद पडते. तुम्हालाही अशा समस्यांचा सामना करावा लागला असेल, तर या पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमची कार-बाईक सुरक्षित ठेवू शकता.


कार-बाईक अर्ध्याहून अधिक पाण्यात पडून बंद पडल्यास करा हे उपाय 


पावसाळ्यात अनेक वेळा रस्ते इतके पाण्याने भरतात की तुमची कार-बाईक अर्ध्याहून अधिक पाण्याखाली जाते. अशा परिस्थितीत इंजिनपर्यंत पाणी पोहोचल्याने वाहन बंद होते. अशावेळी तुमची कार-बाईक पाण्यापासून दूर ढकलून किंवा टोइंग करून पाण्यातून बाहेर काढा. जर कार अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडली असेल आणि बाहेर पडण्याचा मार्ग नसेल तर चारही बाजूंनी दरवाजे उघडा, जेणेकरून कार बुडणार नाही. अशा स्थितीत गाडी सुरू करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. कारण इंजिनमध्ये पाणी जाऊ शकते. कार-बाईक काही तास अशा ठिकाणी ठेवा ज्यातून पाणी बाहेर पडेल. यानंतर कार सुरू करा, जर गाडीचे इंजिन सुरू झाले नाही तर मेकॅनिकला बोलवा.


पाणी साचलेल्या ठिकाणी पहिल्या गीअरमध्ये गाडी चालवा


पावसात कधीही जास्त वेगाने वाहन चालवू नका. जर तुम्हाला इंजिनमध्ये पाणी जाण्यापासून रोखायचे असेल, तर पहिल्या किंवा दुसऱ्या गीअरमध्ये कमी वेगाने गाडी चालवा. त्यामुळे लगेच ब्रेक लावणे सोपे होईल आणि गाडीही सुरक्षित राहते. ब्रेक, क्लच पेडलमधूनही पाणी आत शिरू शकते. हे टाळण्यासाठी गाडी चालवताना हळूच ब्रेक दाबा. त्यामुळे ब्रेक शूमधील पाणी बाहेर पडून ते लवकर सुकते. 


दुचाकीस्वारांनी या गोष्टी लक्षात ठेवा


जर तुम्ही दुचाकीवरून जात असाल तर सुरक्षिततेसाठी नेहमी हेल्मेट घाला. बाईकची चाके कमी रुंद असतात. त्यामुळे नेहमी मागील ब्रेकचा वापर करा. यामुळे दुचाकी घसरण्याचा धोका कमी होईल. पावसात बाईक थांबली तर लगेच पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. बाईकमधून पाणी निघेपर्यंत थांबा आणि मग ती सुरू करा. जर स्टार्ट किकने बाईक सुरू होत नसेल, तर स्पार्क प्लग तपासा. स्वच्छ सुती कापडाने स्पार्क प्लग साफ केल्यानंतर, त्याला करंट येत आहे का ते तपासा. करंट येत नसेल तर बॅटरी तपासा. बॅटरी फिक्स करूनही बाईक सुरू झाली नाही तर मेकॅनिकला बोलवा.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI