Hero Xpulse 200 4V 2022: Hero MotoCorp ने Xpulse 200 4V ऑफ रोड बाईकची रॅली एडिशन सादर केली आहे. यापूर्वी कंपनीने Xpulse 200 4V साठी रॅली किट लॉन्च केले होते. जे 38,000 रुपयांच्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहे. कंपनीने Hero Xpulse 200 4V रॅली एडिशन बाईकच्या कार्यक्षमतेत केवळ सुधारणा केली नाही, तर पूर्वीपेक्षा अधिक ऑफ-रोड क्षमता देखील दिली आहे. 


बाईकमध्ये मिळणार हे अपडेट्स 


रॅली एडिशनचा Hero Xpulse 200 4V स्टँडर्ड मॉडेलपेक्षा काही अधिक फीचर्ससह येतो. बाईकला नवीन हँडलबार, लांब फ्रंट सस्पेंशन, नवीन साइड स्टँड, चांगली पकड असलेले टायर आणि नवीन सीट देखील मिळते. मिळालेल्या माहितीनुसार, बाईकचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील अपडेट करण्यात आले आहे. समोर आलेल्या फोटोनुसार, कंपनी ही बाईक फॅक्टरी टीम पेंटमध्ये लॉन्च करू शकते. अपडेटसह Xpulse 200 4V Rally Edition ची किंमत स्टँडर्ड मॉडेलपेक्षा जास्त असू शकते. ही बाईक स्टँडर्ड Xpulse 200 4V पेक्षा 40,000 रुपये जास्त महाग असू शकते, असे सांगण्यात येत आहे.


इंजिन 


रॅली एडिशनच्या इंजिनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. यात 199.6cc ऑइल-कूल्ड, OHC 4-व्हॉल्व्ह इंजिन स्टँडर्ड मॉडेलसारखे आहे. हे इंजिन 8,500 rpm वर 19.1 bhp ची पॉवर आणि 6,500 rpm वर 17.35 न्यूटन टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. दरम्यान, दुचाकी क्षेत्रातील दिग्गज Hero Motocorp ने जून 2022 मध्ये 4,84,867 युनिट्सची विक्री नोंदवली असून विक्रीत 3.35% वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 4,69,160 मोटारींची विक्री नोंदवली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI