First Car of Famous Celebrities : जगभरात असे अनेक क्रिकेटर आणि सेलिब्रिटी आहेत ज्यांना खरंतर कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज लागत नाही. जगभरात या सेलिब्रिटींचे अनेक फॅन्स आहेत. त्यांना या सेलिब्रिटींचे प्रत्येक अपडेट्स ठेवायचे असतात. मग ते त्यांचे घर असो, त्यांची लाईफस्टाईल, त्यांचं कार कलेक्शन किंवा मग त्यांचं स्टाईल स्टेटमेंट या प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांच्या चाहत्यांना हवी असते. आता जरी हे सेलिब्रिटी महागड्या गाड्यांमधून फिरत असले तरी स्टारडम मिळण्यापूर्वी त्यांची पहिली कार कोणती होती हे तुम्हाला माहित आहे का? जर तुम्हाला माहित नसेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही फेमस सेलिब्रिटींच्या पहिल्या कारबद्दल माहिती सांगणार आहोत. 


शाहरुख खानची पहिली कार 


बॉलिवूडमध्ये किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहरूख खानने (Shah Rukh Khan) या इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आज त्याच्याकडे भरपूर आलिशान गाड्या आहेत. पण त्याची सगळ्यात पहिली कार मारूती ओम्नी (Maruti Omni) होती. ही कार शाहरूखला त्याच्या आईने गिफ्ट केली होती. 


अमिताभ बच्चन यांची पहिली कार 


अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ज्यांना बॉलिवूडचे बिग बी म्हटलं जातं. त्यांच्याकडे कारचं मोठं कलेक्शन आहे. पण त्यांच्या पहिल्या कारबाबत जाणून घ्याल तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. त्यांची पहिली कार सेकंड हॅन्ड फियाट 1100 होती, ज्यामध्ये 1089cc-1221cc इंजिन होते. 


अक्षय कुमारची पहिली कार


अॅक्शन हिरो अक्षय कुमारला (Akshay Kumar) लक्झरी कारची फार आवड आहे. पण, त्याच्या मालकीची पहिली कार फियाट पद्मिनी होती. या कारची निर्मिती साधारण 1964 ते 2001 दरम्यान झाली होती. 


सलमान खानची पहिली कार 


बॉलिवूडमध्ये भाईजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानकडे (Salman Khan) अनेक आलिशान गाड्या आहेत. पण त्याची पहिली कार सेकंड हॅन्ड ट्रायम्फ हेराल्ड (Triumph Herald) होती. ही कार अभिनेते ऋषी कपूर यांच्या चित्रपटात वापरली गेली होती, त्यानंतर सलमान सलीम खानने ही कार विकत घेतली. 


सचिन तेंडुलकरची पहिली कार 


मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) क्रिकेटचा देव म्हटलं जातं. सचिनकडे 360 मोडेना फेरारीसारखी सुपरकारही आहे. पण त्याची पहिली कार मारुती 800 (Maruti 800) होती.


सारा अली खानची पहिली कार


बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानची (Sara Ali Khan) पहिली कार पांढर्‍या रंगाची ओल्ड जनरेशनची Honda CR-V होती. मात्र, आता ती नवीन जीप कंपासमधून प्रवास करते.


महत्त्वाच्या बातम्या :


BYD Seal Electric Car: BYD सील इलेक्ट्रिक कार लवकरच होणार लॉन्च, टेस्लाला देणार टक्कर


Car loan Information:

Calculate Car Loan EMI