BYD Seal Car: चीनची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी BYD लवकरच आपली इलेक्ट्रिक कार BYD सील लॉन्च करणार आहे. ही कार कंपनीची तिसरी कार असेल. याची माहिती कंपनीने आपल्या वेबसाइटवर शेअर केली आहे. कंपनी 2023 च्या चौथ्या तिमाहीत (सप्टेंबर-ऑक्टोबर) याची बुकिंग सुरू करू शकते आणि याची किंमत सुमारे 70 लाख रुपये ठेवली जाऊ शकते. भारतात नुकत्याच झालेल्या ऑटो एक्सपोमध्ये ही कार सादर करण्यात आली होती. लॉन्च केल्यानंतर ही BYD कार टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार मॉडेल 3 शी स्पर्धा करेल.


BYD Seal Car:  पॉवर पॅक


सील BYD इलेक्ट्रिक कार 3.0 ई-प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ही कार दोन बॅटरी पॅकसह ऑफर केली जाईल. पहिला 61.4 kWh जो 550 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम असेल आणि दुसरा 82.5 kWh पॉवरफुल पॅक, जो या कारला 700 किमी पर्यंत जबरदस्त रेंज देऊ शकेल. BYD ची ही इलेक्ट्रिक कार अधिक सुरक्षित करण्यासाठी 'सेल टू बॉडी' तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. तसेच यामुळे इलेक्ट्रिक कारची सुरक्षा, स्थिरता आणि परफॉर्मन्स सुधारेल. या कारमध्ये ड्युअल-मोटर पॉवरचा वापर करण्यात आला आहे. ही कार ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) फीचर्ससह येईल, ज्यामध्ये फ्रंट-एक्सलला जोडलेली मोटर जास्तीत जास्त 218bhp पॉवर देईल. तसेच एक्सल 318bhp जास्तीत जास्त पॉवर देण्यास सक्षम आहे. म्हणजेच कारला एकूण 530bhp पॉवर मिळेल. त्यामुळे ही कार केवळ 3.8 सेकंदात 0-100 किमी/ताशीचा वेग पकडू शकेल.


BYD Seal Car: फीचर्स 


या इलेक्ट्रिक कारमध्ये आढळलेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात रोटेटिंग 15.6-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. यासोबतच दोन वायरलेस चार्जिंग पॅड, हुड (हेड अप डिस्प्ले), प्रीमियम ऑडिओ सिस्टीम आणि हीटेड विंडस्क्रीन अशा अनेक सुविधा आहेत. या कारच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, ही कार Ocean X कॉन्सेप्टसारखीच आहे. याची डिझाइन कूप कारसारखी करण्यात आली आहे. ज्यामध्ये स्प्लिट हेडलॅम्प, चार बूमरॅंग आकाराचे एलईडी डीआरएल, फ्लश फिटिंग डोअर हँडल आहेत, ज्यात मागील बाजूस पूर्ण रुंदी झाकणारी लाईट बार आहे.


BYD Seal Car: 'या' कारशी होणार स्पर्धा 


बीवायडीची ही इलेक्ट्रिक सेडान कार टेस्लाच्या मॉडेल 3 कारशी स्पर्धा करेल. या टेस्ला कारची रेंज एका चार्जवर 423 किमी ते 568 किमी आहे. ही कार केवळ 4.5 सेकंदात 0 ते 100 किमीचा वेग पकडण्यास सक्षम आहे आणि तिचा वेग 260 किमी/तास आहे. भारतात आल्यावर याची संभाव्य किंमत सुमारे 60 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI