December Discounts Offers : सध्या सगळीकडे लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अशातच जर तुम्ही नवीन कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण या डिसेंबर महिन्यात काही कार कंपन्या त्यांच्या कारवर भरघोस सूट देत आहेत. ज्या माध्यमातून तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. कोणकोणत्या कारवर विशेष ऑफर देण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. 


Renault Kiger


Renault या महिन्यात या कारवर 15,000 रूपये एक्सचेंज बोनस, 10,000 रूपये स्क्रॅपेज लाभ, 10,000 रूपये कॉर्पोरेट सवलत आणि दोन वर्षांची कारवर वॉरंटी सुद्धा देत आहे. अशा प्रकारे, या कारवर एकूण  45,000 रूपयांची बचत केली जाऊ शकते. 


Honda Jazz


Honda 10,000 रूपयांची रोख सवलत, 10,000 रूपयांचे एक्सचेंज डिस्काउंट, 7,000 रूपयांचा Honda एक्सचेंज बोनस आणि 12,047 रूपये किंमतीच्या जॅझ कारवर मोफत अॅक्सेसरीज देत आहे. या कारच्या खरेदीवर ग्राहक एकूण 39,047 रुपयांपर्यंत बचत करू शकता. 


Renault KWID


Renault Kwid 10,000 रूपये कॉर्पोरेट सवलत, 15,000 रूपयांचा एक्सचेंज ऑफर, 10,000 स्क्रॅप बेनिफिट आणि 10,000 रूपये रोख सूट यासह एकूण 45,000 रुपयांच्या सवलतीच्या ऑफर मिळवत आहेत. 


Honda WR-V


डिसेंबरमध्ये, WR-V चे सर्व पेट्रोल व्हेरिएंट 30,000 रूपयांच्या रोख सवलतीसह, 20,000 रूपयांच्या एक्सचेंज डिस्काउंटसह, 7,000 रूपयांचा Honda एक्सचेंज बोनस, 5,000 रूपयांचा लॉयल्टी बोनस आणि 35,340 रूपयांच्या मोफत अॅक्सेसरीजसह उपलब्ध आहेत. या कारच्या खरेदीवर ग्राहक एकूण 72,340 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. 


5th Generation Honda City 


Honda 30,000  ची रोख सवलत, ₹20,000 ची एक्सचेंज डिस्काउंट, ₹7,000 चा Honda एक्सचेंज बोनस, ₹8,000 ची कॉर्पोरेट सूट आणि ₹32,145 किमतीच्या विनामूल्य अॅक्सेसरीज त्याच्या पाचव्या पिढीतील सिटी कारच्या सर्व पेट्रोल प्रकारांवर देत आहे. या कारच्या खरेदीवर ग्राहक एकूण 72,145 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. त्याचबरोबर सिटी हायब्रीडवर कोणतीही ऑफर दिली जात नाही. 


Renault Triber


Renault या महिन्यात त्यांच्या ट्रायबर कारवर 25,000 रूपयांचा एक्सचेंज बोनस, 10,000 रूपयांची कॉर्पोरेट सूट, 10,000 रूपयांचा स्क्रॅपेज लाभ आणि 15,000 रूपयांची रोख सवलत देत आहे. अशा प्रकारे, या कारच्या खरेदीवर एकूण 60,000 रूपयांची बचत केली जाऊ शकते.


Honda Amaze


या डिसेंबरमध्ये, Honda कारवर 10,000 रूपयांची रोख सवलत, 10,000 रूपयांची एक्सचेंज सूट, 5,000 रूपयांचा लॉयल्टी बोनस, 6,000 रूपयांची कॉर्पोरेट सूट आणि 12,144 रूपयांच्या किमतीच्या विनामूल्य अॅक्सेसरीज देत आहे. या कारच्या खरेदीवर ग्राहक एकूण 43,144 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. 


4rth Generation Honda City 


चौथ्या पिढीच्या होंडा सिटीच्या खरेदीवर केवळ रु. 5,000 चा लॉयल्टी बोनस दिला जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Mercedes-Benz GLB : मर्सिडीजनच्या दोन नवीन एसयूव्ही कारची बाजारात दमदार एन्ट्री; 'या' कारशी स्पर्धा करणार


Car loan Information:

Calculate Car Loan EMI