Mercedes-Benz GLB : जर्मनीची वाहन उत्पादक कंपनी मर्सिडीज आपल्या लक्झरी वाहनांसाठी जगप्रसिद्ध आहे. नुकतंच मर्सिडीजने भारतात आपल्या दोन नवीन कार GLB आणि EBQ लाँच केल्या आहेत. EBQ ही इलेक्ट्रिक कार आहे. या कारची किंमत 74.5 लाख रुपयांपासून सुरू होते. तर, GLB ची किंमत 63.8 लाख रुपयांपासून सुरू होते. या दोन्ही कार एकंदरीत लूक आणि साईझच्या बाबतीत जवळपास सारख्याच आहेत. मात्र, यापैकी एक इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे.   


तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च झाली GLB


मर्सिडीज-बेंझने देशात तिची GLB SUV तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे. ज्यामध्ये GLB 200 ची एक्स-शोरूम किंमत 63.8 लाख रुपये, GLB 220D ची एक्स-शोरूम किंमत 66.8 लाख रुपये आणि GLB 220 D 4M ची एक्स-शोरूम किंमत 69.8 लाख रुपये आहे. 


मर्सिडीज GLB चा लूक कसा आहे? 


कारला समोरच्या बाजूला सिंगल-स्लॅट ग्रिल आणि मध्यभागी मोठ्या स्क्वेअर ग्रिल मिळतात. यासोबतच नवीन डिझाईनचा एलईडी हेडलॅम्प आणि दोन भागात विभागलेला टेल लॅम्प देण्यात आला आहे. याशिवाय त्याच्या बॉडी डिझाइनमध्येही थोडा बदल करण्यात आला आहे. 


मर्सिडीज GLB चे इंजिन कसे आहे?


Mercedes-Benz GLB ला 1.3-लीटर पेट्रोल इंजिन आणि 2.0-लीटर इंजिन पर्याय आहे. जे अनुक्रमे 161 एचपी पॉवर आणि 250 एनएम पीक टॉर्क आणि 188 एचपी पॉवर आणि 400 एनएम टॉर्क जनरेट करतात. कारमध्ये 7-स्पीड आणि 8-स्पीड ड्युअल क्लच गिअरबॉक्सचा पर्याय आहे.  


मर्सिडीज-बेंझ EQB ती वैशिष्ट्ये काय? 


या एसयूव्हीमध्ये मर्सिडीजच्या क्लासिकल एलईडी हेडलाईट्स आणि टेललाईट्स देण्यात आल्या आहेत. याबरोबरच एलईडी स्ट्रिप, वायरलेस चार्जर, यूएसबी टाइप-सी पोर्ट, पॅनोरामिक सनरूफ, इलेक्ट्रॉनिक टेलगेट यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. 


मर्सिडीज EQB पॉवरट्रेन


मर्सिडीज EQB 66.5 kWh बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे. त्यातील इलेक्ट्रिक मोटर 225 hp पॉवर आणि 390 Nm पीक टॉर्क निर्माण करते. ही कार केवळ 32 मिनिटांत 0 ते 80% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते. याबरोबरच 11 किलोवॅट चार्जरचा पर्यायही उपलब्ध आहे, ज्यामुळे या कारला चार्ज होण्यासाठी 6 तास 25 मिनिटे लागतात.


कोणाशी स्पर्धा करणार?


भारतीय बाजारपेठेत, मर्सिडीज GLB ची स्पर्धा Jaguar F Pace शी होईल, ज्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 74.88 लाख रुपये आहे. दुसरीकडे, Mercedes EQB, Kia EV6 सह देशात लॉन्च केले जाईल, ज्याची प्रारंभिक किंमत सुमारे 60 लाख रुपये आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Mercedes-Benz EQB : दमदार इंजिन आणि 7 सीटर कारसह Mercedes-Benz EQB चा वाचा संपूर्ण रिव्ह्यू


Car loan Information:

Calculate Car Loan EMI