Best Mileage Cars : पेट्रोल-डिजेलच्या वाढत्या किंमतीमुळे सामन्य माणसाच्या खिशाला कात्री लागत आहे. अशामध्येही जर कार खरेदीची करण्याची इच्छा असेल तर काही उत्तम पर्याय बाजारात आहेत. यामध्ये बजेटमधील किंमत आणि नंतर चालवतानाही खिशाला परवडेल, अशा गाड्या हव्या असल्यास 5 लाखांच्या आतील खालील पर्याय तुम्ही नक्कीच पाहा...


मारुती सुजुकी ऑल्टो (Maruti Suzuki Alto)



  • मारुतीच्या या कारमध्ये बीएस6 कम्प्लायंट असणारं 796 सीसी, 3-सिलेंडर आणि 12-वॉल्वचं इंजिन बसवलं आहे.

  • इंजिन 48PS पॉवर आणि 69Nm पर्यंत पीक टॉर्क ही कार निर्माण करु शकते.  

  • इंजिनेमध्ये 5-स्पीड मॅनुअल ट्रान्समिशन असणाऱ्या या गाडी 35 लीटरची फ्यूल टाकी आहे.

  • विशेष म्हणजे ही कार 22 ते 32 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते.

  • गाडीची सुरुवाती किंमत (EX Showroom Price) जवळपास  4.83 लाख इतकी आहे.


दॅटसन रेडी-गो (Datsun Redi-Go)



  • ही कार 0.8-लीटर आणि 1-लीटर अशा दोन इंजिनमध्ये उपलब्ध आहे. 

  • 8-लीटर इंजिन असणारी कार 54 PS ची पॉवर आणि 72 पर्यंत पीक टॉर्क निर्माण करु शकते.  

  • 1-लीटर इंजन असणारी कार 68 PS ची पॉवर आणि 91 Nm पर्यंत पीक टॉर्क निर्माण करु शकते.  

  • 5-स्पीड मॅनुअल ट्रान्समिशनसह 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनही या गाडीमध्ये उपलब्ध आहे.

  • ही गाडी 22 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते.

  • गाडीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 3.98 लाख रुपये असून टॉप व्हेरियंट 4.96 लाख रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहे.


रेनो क्विड (Renault Kwid)



  • आधुनिक रेनो क्विड (2021 Renault Kwid) 8-लीटर आणि 1.0-लीटर अशा दोन इंजिनमध्ये उपलब्ध आहे.

  • 799 सीसी, 3 सिलेंडर, 12 वॉल्व इंजिन  54 PS ची पॉवर आणि 72 Nm पीक टॉर्क निर्माण करु शकते.

  • 999 सीसी, 3 सिलेंडर, 12 वॉल्व इंजन असणारी कार 68 PS ची पॉवर आणि 91 Nm पीक टॉर्क निर्माण करु शकते.  

  • ही गाडी 23 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते.

  • गाडीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 4.06 लाख रुपये असून टॉप व्हेरियंट 4.51 लाख रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहे.


हे ही वाचा :




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



Car loan Information:

Calculate Car Loan EMI