2022 Apache RTR 200 4V Launch : टीव्हीएस मोटार (TVS Motor) कंपनीने मंगळवारी (1 डिसेंबर) नवी 2022 अपाचे आरटीआर 200 4 व्ही (2022 Apache RTR 200 4V) लॉन्च केली आहे. या बाईकची सुरुवाती किंमत 1 लाख 33 हजार 840 रुपये (EX Showroom Price) इतकी असणार आहे. या नव्या 2022 Apache RTR 200 4V मध्ये दोन प्रकार असणार आहेत. ज्यामध्ये सिंगल-चॅनल ABS आणि डुअल-चॅनल ABS असे प्रकार असतील. यातील सिंगल चॅनेल ABS ची किंमत 1 लाख 33 हजार 840 रुपये आणि डुअल-चॅनल ABS ची किंमत 1 लाख 38 हजार 890 रुपये असणार आहे.
काय आहेत फिचर्स?
नव्या 2022 Apache RTR 200 4V मध्ये तीन रायडिंग मोड (स्पोर्ट, अर्बन आणि रेन) असतील. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने रायडिंग करु शकतो. याशिवाय बाईकमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे फ्रंट सस्पेंशन, टीव्हीएस स्मार्टएक्सोनेक्ट ब्लूटूथ कनेक्टिविटी, मोनो-शॉक आणि अॅडजस्टेबल ब्रेक असे फिचर्स असणार आहेत.
इंजिन
नव्या 2022 अपाचे आरटीआर 200 4व्ही मध्ये 197.75cc, सिंगल-सिलेंडर, फोर-वॉल्व, ऑयल-कूल्ड इंजिन असणार आहे. यावेळी 5-स्पीड गियरबॉक्स देण्यात आलेल आहे. तर बाईकचं इंजिन 8,500rpm वर 20.5PS आणि अधिकतम पॉवर आणि 7,500rpm वर 16.8Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. स्पोर्ट्स मोडमध्ये बाईकचा टॉप स्पीड 127 Km/h आणि इतर मोडमध्ये 105 Km/h इतकं स्पीड असणार आहे. बाईक ग्लॉस ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि मॅट ब्लू या रंगात उपलब्ध असेल.
हे ही वाचा :
Royal Enfield ची नवी बाईक लवकरच बाजारात, प्रसिद्ध हिमालयन मॉडेलचं स्वस्त Version
Volkswagenची नवी Tiguan प्रीमियम SUV, 'या' SUVना देणार टक्कर, खास फिचर्स, भन्नाट लूक
Instagram New Feature : Instagram आणणार नवं फिचर, 60 सेकंदांपर्यंतचे स्टोरीज व्हिडीओ करता येणार पोस्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Car loan Information:
Calculate Car Loan EMI