Royal enfield scram 411 : रॉयल इनफिल्ड या जगप्रसिद्ध कंपनीचे बुलेट, हिमालयन, इंटरसेप्टर असे एक न अनेक धांसू मॉडेल सध्या बाजारात आहेत. अगदी जुनी कंपनी असूनही आजच्या तारखेतही तरुणांना खास भावनारी बाईक कंपनी रॉयल इनफिल्ड पूर्वी बुलेट या मॉडेलसाठी सर्वाधिक ओळखली जात. पण आता कंपनीचे अनेक मॉडेल बाजारात असून यामध्येच एक नवं मॉडेलही दाखल होणार आहे.


फेब्रुवारी, 2022 मध्ये रॉयल  इनफिल्ड त्यांची नवी बाईक लॉंच करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या मॉडेलचं नाव Scram 411 असं असून शकतं. विशेष म्हणजे ही बाईक प्रसिद्ध हिमालयन अँडव्हेंचर (Himalayan ADV) या मॉडेलचंच स्वस्त व्हर्जन असणार आहे. समोर येणाऱ्या माहितनुसार, ही बाईक भारतात फेब्रुवार, 2022 पासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. Scram 411 असं नाव असून शकणाऱ्या या बाईकबद्दल कंपनीनं अजून अधिकृत वक्तव्य केलं नसलं तरी रॉयल इनफिल्डचे चाहते मात्र या गाडीसाठी कमालीचे उत्सुक आहेत.


कशी असेल 'Royal Enfield Scram 411?'


कंपनीची प्रसिद्ध हिमालयन बाईक दुर्गम भागात चालवण्यासाठी सर्वाधिक वापरली जाते. त्याप्रमाणेच Scram 411 ही बाईक देखील दुर्गम रस्त्यांसाठी सर्वाधिक वापरली जाऊ शकते. बाईकमध्ये उंच विंडस्क्रीन, स्प्लिट सीट, स्टँडर्ड लगेज रॅक, मोठे फ्रंट व्हील असे हिमालयनप्रमाणेचे फिचर्स असू शकतात. तसंच LS410,  सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, SOHC इंजिन मोटारसायकलच्या इंजिनमध्ये वापरलं जाऊ शकतं.


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI