Air Pollution: SUV गाड्या या स्पेशियस असतात. एका SUV गाडीमध्ये जवळपास 5-7 लोक प्रवास करू शकतात. सध्या देशातील अनेक शहरांमध्ये प्रदुषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एअर प्युरिफायर असणाऱ्या गाड्यांना लोकांची पसंती देतात. जाणून घेऊयात भारतातील एअर प्युरिफायरसह मिळणाऱ्या भारतातील बजेट फ्रेंडली आलिशान SUV गाड्या. या गाड्यांची किंमत 10 लाखांपेक्षा कमी आहे- 


ह्युंडाई व्हेन्यू (Hyundai Venue)
एअर प्युरिफायर बसवलेल्या काही एसयूव्ही कारपैकी ह्युंडाई व्हेन्यू ही एक कार आहे.  ह्युंडाई व्हेन्यू गाडीमधील एअर प्युरिफायरमध्ये  HEPA हे फिल्टर आहे जे धूळीचे कण फिल्टर करते. या कारमध्ये दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिन मिळते.  


किया सोनेट (Kia Sonet)
किया सोनेट  ही सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. या कारमध्ये स्मार्ट प्युअर एअर प्युरिफायर नावाचे असे एअर प्यूरिफायर आहे जे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायरसपासून तुमचे संरक्षण करू शकते. सोनेट एअर प्युरिफायरमध्ये टॉप-एंड ट्रिम आहे. 


रेनॉल्ट किगर (Renault Kiger)
रेनॉल्ट किगर कारमध्ये अनेक फिचर्स आहेत. त्यापैकी  एअर प्युरिफायर हे एक फिचर आहे. किगरमध्ये फिलिप्स एअर प्युरिफायर आहे जे हवा शुद्ध करते आणि गाडीमधील हानिकारक कण काढून टाकते. 


निसान मॅग्नाइट (Nissan Magnite)
निसान मॅग्नाइट गाडीच्या मध्यभागी  एअर प्युरिफायर बसवण्यात आला आहे. मॅग्नाइटमध्ये टर्बो पेट्रोल युनिटसह दोन पेट्रोल इंजिन आहेत तसेच या गाडीमध्ये  CVTऑटोमॅटिक गिअरबॉक्स देखील आहे. 


टाटा पंच (Tata Punch)
टाटा पंच या गाडीमध्ये  एअर-ओ-प्युअर 95 एअर प्युरिफायर आहे.  या एअर प्युरिफायरमध्ये अॅक्टिव्ह कार्बन HEPA फिल्टर आणि UV-C light आहे.


हे ही वाचा :



Car loan Information:

Calculate Car Loan EMI