इंस्टाग्राम (Instagram) च्या वापरकर्त्यांसाठी एक खूशखबर आहे. मेटाकडे (Meta) मालकी असलेली इंस्टाग्राम कंपनी लवकरच नवीन फिचर आणणार आहे. या नवीन फिचरमुळे आता युजर्सना 60 सेकदांपर्यतचे व्हिडीओ स्टोरीज बनवून पोस्ट करता येणार आहेत. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हा पूर्ण व्हिडीओ पूर्वीप्रमाणे वेगवेगळ्या भागांमध्ये नाही तर एकत्र दिसणार आहे. जाणून घेऊयात काय आहे इंस्टाग्रामचा नवा फिचर आणि फिचर कधी होऊ शकतं लाँच.


नव्या फिचरची सुरु आहे चाचणी
सोशल मीडिया सल्लागार Matt Navarra आणि Alessandro Paluzzi यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती शेअर केली आहे. त्यांनी म्हटलंय की, इंस्टाग्रामवर लवकरच 60 सेकंदापर्यंतच्या स्टोरीज व्हिडीओ बनवण्याचा पर्याय उपलब्ध होईल. कंपनी या नव्या फिचरची चाचणी करत आहे. दरम्यान, सुरुवातीला ही सुविधा केवळ आयओएस  (iOS) युजर्ससाठी असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर या फिचरला अँडॉईड (Android) युजर्ससाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. या फिचरमध्ये महत्त्वाचं म्हणजे स्टोरीजवरील व्हिडीओ वेगवेगळ्या भागांऐवजी एकत्र दिसेल. त्यामुळे युजर्सला एकाच फ्रेममध्ये पूर्ण स्टोरी पाहता येईल.


 


 




 


प्रत्येक व्हिडीओ आता रिल्सच्या श्रेणीमध्ये
याशिवाय इंस्टाग्राम आता प्रत्येक व्हिडीओला रील्सच्या श्रेणी (Category)मध्ये समाविष्ट करणार असल्याचीही चर्चा आहे. व्हिडीओ साईज किंवा वेळ जास्त असलेल्या व्हिडीओचा रिल्समध्येच समावेश करण्यात येईल. कंपनी प्रत्येक व्हिडीओला रील्सच्या कॅटेगरीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इंस्टाग्राम रील्स व्हिडीओचा वेळही वाढवण्याच्या विचारात आहे. त्यामुळे आता युजर्सला या नवीन फिचर्सची प्रतिक्षा आहे.



हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha