BMW XM Price and Features : लक्झरी कार निर्माता कंपनी BMW ने देशात आपली नवीन फ्लॅगशिप SUV XM लॉन्च केली आहे. ही नवीन कार कंपनीने सप्टेंबर 2022 मध्ये सादर केली होती. भारतात या कारची एक्स-शोरूम किंमत 2.60 कोटी रुपये आहे. ही कार पेट्रोल इंजिनसह हायब्रिड टेक्नॉलॉजीसह सुसज्ज आहे. प्लग-इन हायब्रीड टेक्नॉलॉजीसह बाजारात दाखल होणारी ही पहिली M ब्रँड एसयूव्ही असणार आहे. BMW पुढील वर्षी मे महिन्यात या नवीन कारची डिलिव्हरी सुरू करणार आहे.  


पॉवरट्रेन कशी आहे?


BMW XM मध्ये अतिशय पॉवरफुल 4.4-लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन वापरले गेले आहे, जे 653 bhp ची कमाल पॉवर आणि 800 Nm चे पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. हे इंजिन सर्व चाकांना पॉवर देते. याबरोबरच 25.7 kWh क्षमतेची बॅटरी पॅक क्षमता असलेली प्लग-इन हायब्रिड सिस्टीमही देण्यात आली आहे.  


ही कार EV मोडवरही धावू शकते


ही कार पूर्णपणे ईव्हीप्रमाणे चालवता येते. ज्यामध्ये ते 88 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. त्याची बॅटरी चार्ज करण्यासाठी 7.4 किलोवॅटचा एसी फास्ट चार्जर देण्यात आला आहे. या कारला 0 ते 100 किमीचा वेग पकडण्यासाठी फक्त 4.3 सेकंद लागतात. ही कार ताशी 140 किमी वेगाने धावू शकते. 


BMW XM ची वैशिष्ट्य काय आहेत?


लक्झरी SUV ला 23-इंचाची अलॉय व्हील्स, गोल्डन अॅक्सेंटसह मोठी किडनी ग्रिल, वर्टिकल स्टाईल एक्झॉस्ट आणि स्प्लिट हेडलॅम्प सेटअप मिळते. दुसरीकडे, फीचर्सवर नजर टाकल्यास, यात 14.9-इंच टचस्क्रीन, हरमन कार्डन सराउंड साउंड सिस्टम, 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फोर-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ADAS टेक्नॉलॉजी आणि एंबिएंट लायटिंगसारखी वैशिष्ट्ये आहेत. 


'या' कारला टक्कर देणार 


ही नवी BMW कार भारतीय बाजारपेठेत लॅम्बोर्गिनी उरूसला टक्कर देईल. कारला 4-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन मिळते, जे 650 PS पॉवर आणि 850 Nm टॉर्क निर्माण करते. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ही कार ताशी 305 किमी वेगाने धावू शकते.


महत्त्वाच्या बातम्या : 


Mercedes Car : हायब्रिड इंजिनसह Mercedes AMG S63 सादर; 'या' लक्झरी कारशी स्पर्धा करणार


Car loan Information:

Calculate Car Loan EMI