Car-Bike Discount Offers : 2022 वर्ष संपून 2023 वर्ष सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच दिग्गज वाहक कार निर्मात्या कंपन्या आपल्या जुन्या वाहनांवर बंपर डिस्काऊंट ऑफर देतेय. वर्षाच्या या शेवटच्या दिवसांमध्ये अनेक दुचाकी आणि कार उत्पादक ब्रँड त्यांच्या वाहनांवर भरघोस सवलतीच्या ऑफर देत आहेत. त्यामुळे ग्राहकांना नवीन वाहन खरेदीवर मोठी बचत करण्याची सुवर्णसंधी आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या वाहनावर किती सूट दिली जात आहे.  


महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) :


महिंद्रा अॅंड महिंद्रा कंपनी (Mahindra & Mahindra) या महिन्यात आपल्या कारवर सूट देत आहे. डिसेंबरमध्ये, ग्राहक XUV300 च्या खरेदीवर 1 लाख रुपयांपर्यंत आणि थारच्या पेट्रोल प्रकारावर 20,000 रुपयांपर्यंतची बचत करू शकतात आणि बोलेरो, बोलेरो निओच्या खरेदीवर 95,000 रुपयांपर्यंत सूट देऊ शकतात.


मारुती सुझुकी (Maruti Suzuki) : 


मारुती सुझुकीने नवीन वर्षापासून आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. पण त्याआधी ग्राहकांना काही मोठ्या डिस्काउंट ऑफर्सही देत ​​आहे. या महिन्यात, कंपनी आपल्या ग्राहकांना S-Presso, Dzire, Eeco, Alto तसेच Baleno, Ciaz आणि Ignis सारख्या कारच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. त्यांच्या खरेदीवर, ग्राहक 57,000 ते 72,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात.  


टाटा मोटर्स (Tata Motors) : 


Tata Motors या महिन्यात Safari आणि Harrier सारख्या SUV वर एकूण 65,000 रूपयांपर्यंत रोख सूट आणि एक्सचेंज फायदे देत आहे. त्याच वेळी, ग्राहक Tiago आणि Tigor च्या खरेदीवर 35,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. टाटा मोटर्सही नवीन वर्षापासून आपल्या वाहनांच्या किमती वाढवणार आहे. 


ह्युंदाई मोटर्स (Hyundai Motor) : 


Hyundai Motor या डिसेंबरमध्ये आपल्या Grand i10 Nios वर 63,000 रूपयांपर्यंत सूट ऑफर देत आहे, तर इतर मॉडेल Aura आणि i20 वर देखील मोठ्या सवलतीच्या ऑफर मिळत आहेत. 


हिरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) : 


दिग्गज दुचाकी कंपनी या महिन्यात त्यांच्या बाईक पॅशन प्रो आणि इतर अनेक मॉडेल्सवर 3,000 रूपयांची रोख सवलत देत आहे. पण HF Deluxe आणि Splendor सारख्या लोकप्रिय मॉडेल्सवर फारशी सूट मिळत नाहीये.  


टीव्हीएस मोटर (TVS Motors) : 


TVS या महिन्यात त्यांच्या दुचाकींच्या खरेदीवर 5,500 रूपयांपर्यंत सूट ऑफर देत आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Ampere New Electric Scooter: 2023 ऑटो एक्सपोमध्ये अँपिअर लॉन्च करणार नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, आधुनिक फीचर्सने असेल सुसज्ज


Car loan Information:

Calculate Car Loan EMI