BMW Upcoming Electric Cars In India : ऑडी, मर्सिडीज-बेंज, जॅग्वारनंतर आता BMW देखील भारताच्या इलेक्ट्रिक व्हेइकल मार्केमध्ये उतरण्यासाठी सज्ज आहे. कंपनीनं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, पुढील 6 महिन्यांत कंपनी आपल्या तीन इलेक्ट्रिक व्हेइकल बाजारात आणणार आहे. याची सुरुवात पुढील महिन्यात 11 डिसेंबरपासून होणार असल्याचंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं. कंपनी 11 डिसेंबरला BMW iX ही इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. भारतात लॉन्च होणारी ही कंपनीची पहिली ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल. त्यानंतर येणाऱ्या तीन महिन्यांत कंपनी ऑल-इलेक्ट्रिक मिनी लग्जरी हॅचबॅक लॉन्च करणार आहे. त्यानंतर पुढच्या 6 महिन्यांतच ऑल-इलेक्ट्रिक सेडान बीएमडब्ल्यू आय4 कंपनीकडून लॉन्च केली जाणार आहे. 


BMW च्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, कंपनी यंदाच्या वर्षात भारतात एकूण 25 प्रोडक्ट लॉन्च करणार आहे. BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ विक्रम पावाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही प्रोडक्शन वेगानं पुढच्या टप्प्यावर नेणार आहोत. ज्यामुळं आम्ही प्युअर इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या दिशेनं पुढं पाऊल टाकू शकू." पुढे ते म्हणाले की, पुढच्या 180 दिवसांत भारतात बीएमडब्ल्यू तीन ऑल इलेक्ट्रिक प्रोडक्ट लॉन्च करणार आहे. 


पावाह म्हणाले की, "पुढच्या 30 दिवसांमध्ये आम्ही बीएमडब्ल्यू आयएक्स लॉन्च करणार आहोत. ही पूर्णपणे इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल. 90 दिवसांमध्ये कंपनी मिनी इलेक्ट्रिक आणि 180 दिवसांमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक सेडान लॉन्च करणार आहे. जी आय4 असेल." त्यासोबतच कंपनी भारतात इलेक्ट्रिक कार्समध्ये Audi आणि Mercedes ला टक्कर देण्याच्या दिशेनं पुढे पाऊल टाकणार आहे. या दोन्ही कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार बाजारात आणल्या आहेत. 


BMW iX चे स्पेसिफिकेशन्स



  • BMW iX चे वैश्विक पातळीवर दोन व्हेरियंट उपलब्ध आहेत. हा व्हेरियंट iX xDrive 40 आणि iX xDrive 50 आहे. iX xDrive 40 व्हेरियंट 6.1 सेकंदमध्ये 0-100kph वेग पकडू शकतं. तर iX xDrive 50 याहून वेगानं पुढे जाऊ शकते. हे 4.6 सेकंदांमध्ये 0-100kph च्या वेगानं पुढं जाऊ शकते. 

  • दोन्ही व्हेरियंटमध्ये एक ड्यूअल इलेक्ट्रिक मोटर सेटअप देण्यात आला आहे. या कारच्या प्रत्येक एक्सेलवर एक मोटर लावण्यात आली आहे. हे ऑल-व्हिल ड्राइव्ह कार आहेत. याला प्युअर रियर-व्हिल-ड्राइव्ह सेटअपमध्येही चालवता येणं शक्य आहे. 

  • BMW IX xDrive 50 मध्ये 105.2 kWh चा बॅटरी पॅक आहे. तर xDrive 40 मध्ये 71kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे.  iX xDrive 50 ची बॅटरी 35 मिनिटांमध्ये 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. BMW iX xDrive 40 ची बॅटरी 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होण्यासाठी 31 मिनिटं लागतात. 


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा



Car loan Information:

Calculate Car Loan EMI