New Volkswagen Tiguan Premium SUV : फोक्सवॅगन (Volkswagen) ने नुकतीच भारतीय बाजारपेठेत आपली Tiguan कॉम्पॅक्ट SUV लाँच केली आहे. मात्र, फोक्सवॅगन केवळ यावरच थांबलं नाहीय. तर त्यांनी दुसरी SUV आणण्याचीही तयारी सुरु केलीय. फोक्सवॅगनची नवीन Tiguan premium SUV सह बाजारात यावर्षासाठी चार SUV लाँच करण्याची योजना आखली आहे. 7 डिसेंबरला Tiguan कॉम्पॅक्ट SUV लॉन्च होण्याऱ्या Tiguanसाठी फोक्सवॅगनने औरंगाबाद येथे असेंब्लिग सुरू केलं आहे.


नव्या फेसलिफ्ट केलेल्या Tiguan मध्ये डिझाईनसह इंटीरियरमध्येही व्यापक बदल करण्यात आले आहेत. याचं डिझाईन बदलल्यामुळे नव्या बंपर, ग्रिल आणि हेडलॅम्प्ससह नवीन 18 इंचाच्या alloy wheelsमुळे कारचं डिझाईन अधिक आकर्षक आहे. 


Tiguan ही Tiguan AllSpace SUVची लहान आवृत्ती आहे. यात पाच जणांच्या बसण्याची सुविधा आहे. यामध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मोठी टचस्क्रीन, थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, लेदर सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग आणि याव्यतिरिक्त नवीन लूकसह इंटीरियर देखील बदलण्यात आलं आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, नवीन Tiguanमध्ये सहा एअरबॅग्ज, ABS, ESP, ASR, EDL, ऑटो-होल्ड, हिल स्टार्ट असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल, TPMS, 3 हेडरेस्ट रिअर, 3-पॉईंट सीट बेल्ट, ISOFIX फीचर आणि ड्रायव्हर अलर्ट सिस्टम आहे. 


पूर्वीच्या Tiguan मधील सर्वात मोठा बदल इंजिनमध्ये करण्यात आलाय. सध्याची Tiguan फक्त पेट्रोलवर चालणरी SUV असून यामध्ये डिझेल इंजिन उपलब्ध नाही. मात्र, नवीन Tiguan मध्ये 2.0L TSI टर्बो पेट्रोल इंजिन असेल. जे 190PS आणि 320 Nm टॉर्क विकसित करेल. यात 4MOTION ऑल-व्हील ड्राईव्ह आणि पॅडल शिफ्टसह 7-स्पीड DSG ट्रान्समिशन देखील असेल. फोक्सवॅगनची ही नवी दमदार Tiguan कॉम्पॅक्ट SUV बाजारात आधी उपलब्ध असलेल्या Hyundai Tucson, Jeep Compass आणि इतर मध्यम आकाराच्या प्रीमियम SUV सोबत स्पर्धा करेल. 


हे ही वाचा :


डिझेल कारमध्ये इलेक्ट्रिक किट बसवणं सोपंय ? जाणून घ्या...


Mercedes ने लाँच केली A45S कार; अवघ्या तीन सेकंदात 'या' वेगाने सुस्साट!


Honda SUV : भारतात लवकरच होंडा लाँच करणार 'या' दोन एसयूव्ही


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



Car loan Information:

Calculate Car Loan EMI