BMW Gran Limousine Facelift: प्रसिद्ध लक्झरी कार निर्माता कंपनी BMW नवीन वर्षात आपल्या अनेक नवीन कार बाजारात सादर करत आहे. कंपनी आपल्या आलिशान कारसाठी ओळखली जाते. BMW नेहमीच आपल्या कारमध्ये इतर वाहन उत्पदकांच्या तुलनेत नवीन फीचर्स देते. अशातच BMW 10 जानेवारी रोजी भारतात तिची सीरीज 3 ग्रॅन लिमोझिन फेसलिफ्ट लक्झरी कार लॉन्च करणार आहे. BMW ही कार काही खास बदलांसह सादर करणार आहे. जे त्याच्या डिझाइन आणि केबिनमध्ये केले गेले आहे. भारतात ही कार मर्सिडीज-बेंझ सी-क्लास सारख्या कारशी स्पर्धा करेल. या कारमध्ये कंपनीने कोणते बदल केले आहेत? यात कोणते फीचर्स देण्यात आले आहेत, तसेच याची किंमत किती आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घुले... 


Bmw 3 Series Gran Limousine Facelift : बीएमडब्ल्यू ग्रॅन लिमोझिन फेसलिफ्ट डिझाइन


या कारची डिझाइननवीन M340i फेसलिफ्ट सारखी असेल. तसेच नवीन डिझाइनसह स्लीक हेडलॅम्पसह ट्वीक्ड ग्रिल मिळेल. याशिवाय, यात नवीन बंपर, नवीन अलॉय व्हील्ससह अद्ययावत ट्विक केलेले टेल-लॅम्प आणि त्याच्या मागील बाजूस बंपर मिळेल.


Bmw 3 Series Gran Limousine Facelift : बीएमडब्ल्यू ग्रॅन लिमोझिन फेसलिफ्ट केबिन


BMW Gran Limousine Facelift Series 3 मध्ये BMW i4 sedan प्रमाणेच नवीन इंटीरियर मिळेल. ज्यामध्ये नवीन डिझाइन केलेले डॅशबोर्ड, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि अपडेटेड डिझाइन, एअर-कॉन व्हेंटसह सेंटर टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिले जाईल. या नवीन BMW मध्ये लेटेस्ट iDrive 8 टचस्क्रीन वापरण्यात येणार आहे.


Bmw 3 Series Gran Limousine Facelift : बीएमडब्ल्यू ग्रॅन लिमोझिन फेसलिफ्ट इंजिन



कंपनीने त्याच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दोन्ही प्रकार (330i आणि 320d) 2.0-L चार-सिलेंडर पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह येतील. याचे  330i पेट्रोल इंजिन 254 hp कमाल पॉवर आणि 400 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. तर 320d डिझेल इंजिन 187 hp कमाल पॉवर आणि 400 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. ही कार फोर-व्हील-ड्राइव्ह आणि 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध असेल.


इतर पर्याय


पाचव्या पिढीची नवीन कार मर्सिडीज-बेंझ सी-क्लास तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये टॉप-ऑफ-द-लाइन C300d, C200 आणि C220d मॉडेल्सचा समावेश आहे. C200 व्हेरियंटची किंमत 55 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर C220d आणि C300d डिझेल व्हेरियंटची किंमत  56 लाख रुपये आणि 61 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI