Black Box in Cars : युरोपच्या रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांना (Auto News)आता विमानात (Black Box) वापरली जाणारी टेक्नॉलॉजी दिसणार आहे. विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या "ब्लॅक बॉक्स" नावाच्या टेक्नॉलॉजीवर आधारित असलेलं  'इव्हेंट डेटा रेकॉर्डर' (ईडीआर) नावाचा डेटा रेकॉर्डर वापरणं आवश्यक आहे. युरोपियन युनियनमध्ये विकल्या जाणाऱ्या सर्व नवीन कारना आता हे वापरणं सक्तीचं केलं आहे.यामुळे अपघाताच्या तपासाबरोबरच रस्ता सुरक्षा वाढण्यास मदत होणार आहे.  


विमानांमध्ये वापरले जाणारे हे ब्लॅक बॉक्स, ज्याला इव्हेंट डेटा रेकॉर्डर (ईडीआर) असेही म्हणतात. कारच्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक छोटेसे डिव्हाइस लपलेले आहे. जे आवश्यक माहितीचा मागोवा घेण्याचे काम करते. जसे की गाडीचा वेग किती आहे, अपघाताच्या वेळी एअरबॅग उघडल्यावरही ब्रेक किती जोरात दाबले गेले, यासंदर्भातील माहिती देते. ही माहिती पोलिसांनासाठी आणि अपघाताची कारणं शोधण्यासाठी फार महत्वाची असतात. 


साधारणपणे ही एअरबॅग कंट्रोल युनिटमध्ये बसवली जाते. त्यातलं ईडीआर नेहमी चालू असतो ते बंद करता येत नाही. एअरबॅग किंवा सीट बेल्ट प्री-टेन्शनर असेल तर तो आपोआप अॅक्टिव्हेट होतो. जर कारचा अॅक्टिव्ह हुड बाहेर आला किंवा 0.15 सेकंदात ताशी 8 किमीपेक्षा जास्त वेगाने अचानक बदल झाला तर ही रेकॉर्डिंग सुरू होते. ब्लॅक बॉक्स सामान्यत: कमी कालावधीसाठी या डेटाचा मागोवा ठेवतात. अपघाताच्या पाच सेकंद आधी आणि त्याच्या धडकेनंतर फक्त 0.3  सेकंदाचा आढावा आपल्याला मिळू शकतो


काय होणार फायदा?


अपघाताची सामान्य कारणे आणि धोकादायक ड्रायव्हिंग पॅटर्न ओळखून, रस्ता सुरक्षा मोहिमांसह पायाभूत सुविधा देखील सुधारू शकतात. याव्यतिरिक्त अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी ईडीआर डेटा तपासला जाऊ शकतो. यामुळे चालक आणि विमान कंपन्या दोघांसाठीही विमा दाव्याची प्रक्रिया योग्य रितीने होण्यास मदत होईल. 



ब्लॅक बॉक्समुळे विमानाच्या अपघाताची कारणं समोर 


आतापर्यंत अनेकदा विमानाचे अपघात झाले आहेत. प्रत्येक देशातील विमानाचा अपघात झाला आहे. त्यात सुरक्षा यंत्रणांच्या विमानांचादेखील समावेश आहे. या विमानाचा अपघात झाल्यावर बचावकार्य करत असताना या ब्लॅक बॉक्सचा सुरुवातीला शोध घेतला जातो. या बॉक्समधील रिडींग्जनुसार विमानाच्या अपघाताचं कारणं शोधणं सोपं जातं. आतापर्यंत विमानाच्या अपघाताची कारणं याच ब्लॅक बॉक्समुळे समोर आली आहेत. 


इतर महत्वाची बातमी-


Honda Adventure Bike: Honda CB 350 ची नवी अॅडव्हेंचर बाईक डिझाइन लीक; कधी होणार लाँच ?


 

 

Car loan Information:

Calculate Car Loan EMI