Upcoming Honda Motorcycle : सध्या तरुणांमध्ये अॅडव्हेचर (Adventure Bike) बाईक्सची क्रेझ दिसत आहे. अनेक तरुण बुलेट सोबतच अॅडव्हेचर बाईक्स खरेदी करताना दिसत आहे.  अलीकडेच हिमालयन 450 (Honda Adventure Bike  Honda CB 350)आणि येज्दी अॅडव्हेंचरसह अनेक नवीन अॅडव्हेचर बाईक्सची लाँच झाल्या आहेत. पण आता होंडाही नव्या सिंगल सिलिंडर बाईकसोबत अॅडव्हेंचर बाईक्स सेगमेंटमध्ये उतरण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर्स इंडियाने आपल्या CB 350  निओ-रेट्रो बाइक प्लॅटफॉर्मवर आधारित अॅडव्हेचर बाईक्ससाठी डिझाइन पेटंट दाखल केले आहे. ही डिझाईन Royal Enfield Himalayan 411 सारखी दिसत आहे. कधी लाँच होणार यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


डिझाइन कसं आहे? 


पेटंट फोटोंमध्ये स्क्रॅम्बलर आणि रेट्रो अॅडव्हेंचर स्टाईल मोटारसायकल दोन्ही दिसत आहेत, ज्यात समान टँक आणि टेल डिझाइन आहेत. मात्र, दोन्ही मॉडेल्सची फ्रंट स्टायलिंग वेगळी आहे. या अॅडव्हेंचर बाईकमध्ये हिमालयन स्ट्रेंथ असून टँकवर एक्सटर्नल क्रॅशबार आणि लगेज रॅक आहे. काही प्रमाणात डिझाईन  CB 350 मध्ये दिलेल्या पेटंटसारखं दिसत आहे. होंडाच्या एंट्री लेव्हल अॅडव्हेंचर बाईकमध्ये फ्यूल टँकसाठी चांगली डिझाइन आहे.  टाकीच्या दोन्ही बाजूला बोल्ट-ऑन रॅक आहेत. मोटारसायकलला हेडलाईटच्या वरच्या भागापर्यंत पसरलेल्या सेल्फ प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चरसह फ्रंट फेअरिंग मिळते.


कोणते फिचर्स मिळतील?



नवी होंडा सीबी 350 आधारित अॅडव्हेंचर बाईक क्रॅडल चेसिसवर आधारित असेल आणि यात 348 सीसी, एअर कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन आणि 5-स्पीड गिअरबॉक्स मिळेल. हे इंजिन 20.78bhp चे पॉवर आउटपुट आणि 30Nm चे पीक टॉर्क जनरेट करु शकणार आहे. बाईकला लांब प्रवासासाठी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि मागील बाजूस ट्विन शॉक अॅब्जॉर्बर देण्यात आले आहेत. पेटंटमध्ये वायर-स्पोक व्हील, सिंगल स्वीप्टबॅक एक्झॉस्ट आणि हेडलाइट गार्ड देखील दाखवण्यात आला आहे.


 


न्यू रॉयल एनफील्ड हिमालयन 452  टक्कर देणार का?



Honda CB 350 ही बाईक  न्यू रॉयल एनफील्ड हिमालयन 452 या गाडीला टक्कर देण्याची शक्यता आहे. 
या रॉयल एनफिल्ड हिमालयन 452 मध्ये 451.65 सीसी सिंगल सिलिंडर लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. जे नवीन रॉयल एनफिल्ड हिमालयन 411 सीसी युनिटपेक्षा थोडे मोठे आहे. हे इंजिन 8,000 आरपीएमवर 40 बीएचपी पॉवर आणि 5,500 आरपीएमवर 40 एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते. हे इंजिन स्लिप अँड असिस्ट क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडले जाईल.


इतर महत्वाची बातती


Electric Car Care : थंडीत इलेक्ट्रिक कार उघड्यावर पार्क केली तर..., कोणतीही भानगड असो 'या' टिप्स नक्की फॉलो करा!


 

 

 

Car loan Information:

Calculate Car Loan EMI