Tata Altroz Facelift Launch : टाटा मोटर्सने(Tata) अल्ट्रोज आणि पंच मॉडेलचे फेसलिफ्ट (Auto News) मॉडेलने 2024 आणि 2025 मध्ये लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने अल्ट्रोज फेसलिफ्टची टेस्टिंग सुरू केली असून नुकतेच त्याने स्पाय शॉट्सही समोर आले आहेत. ज्यामुळे डिझाईन डिटेल्सची फारशी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या कारमध्ये अनेक बदल करण्यात आले असल्याचं सांगण्यात आलं आहे. इंटेरियरमध्ये आणि इक्सटेरियरमध्येदेखील काही प्रमाणात बदल होणार का हे पण पाहणं महत्वाचं आहे.
काय बदलणार?
याचे इक्सटेरियर बऱ्याच अंशी सध्याच्या मॉडेलसारखेच असण्याची शक्यता आहे. तर इंटिरिअरमध्ये अनेक मोठे अपग्रेड मिळण्याची शक्यता आहे. नव्या अल्ट्रोजमध्ये डॅशबोर्डच्या मध्यभागी मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम मिळणार आहे. या अपडेटेड हॅचबॅकमध्ये 7.0 इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, एअर प्युरिफायर आणि 6 एअरबॅग्जसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
टाटा अल्ट्रोज फेसलिफ्ट पॉवरट्रेन
2024 टाटा अल्ट्रोज फेसलिफ्टमध्ये पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. यात 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन अनुक्रमे 88 बीएचपी आणि 110 बीएचपी जनरेट करते. या हॅचबॅकमध्ये सीएनजी पॉवरट्रेन देखील असेल, ज्यात टाटाच्या ट्विन सिलिंडर सीएनजी तंत्रज्ञानासह 1.2 लीटर पेट्रोल इंजिन मिळेल. 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड डीसीटी सह ट्रान्समिशन पर्याय सध्याच्या मॉडेलसारखेच राहतील.
टाटा अल्ट्रोज रेसर
अल्ट्रोज फेसलिफ्ट लाँच केल्यानंतर टाटा मोटर्स गेल्या वर्षी ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आलेली अल्ट्रोज रेसर लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही हॅचबॅक स्पोर्टी आणि पॉवरफुल व्हेरियंट म्हणून लाँच करण्यात येणार आहे. अल्ट्रोज रेसरची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. यात 120 बीएचपी, 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन किंवा टाटाचे नवीन 125 बीएचपी, 1.2 एल डायरेक्ट इंजेक्शन टर्बो पेट्रोल इंजिन असू शकते जे टाटा कर्व्ह कूप एसयूव्हीसाठी वापरले जाईल.
टाटा कर्व्ह एसयूव्ही डिझेल इंजिनसह येण्याची शक्यता
टाटा कर्व्ह कॉन्सेप्ट बेस्ड कूप एसयूव्ही ही या वर्षी लाँच होणाऱ्या नव्या कारपैकी एक आहे. टाटा मोटर्सने अधिकृतरित्या माहिती दिली आहे की हे मॉडेल सुरुवातीला इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह सादर केले जाईल आणि त्यानंतर त्याचे आयसीई व्हर्जन लाँच केले जाईल. कर्व्ह ईव्हीचे प्रॉडक्शन एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते आणि 2024 च्या शेवटपर्यंत बाजारात लाँच केले जाईल. या इलेक्ट्रिक कूप एसयूव्हीची निर्मिती पुण्याजवळील रांजणगाव येथील टाटाच्या कारखान्यात केली जाईल.
इतर महत्वाची बातमी-
Honda Adventure Bike: Honda CB 350 ची नवी अॅडव्हेंचर बाईक डिझाइन लीक; कधी होणार लाँच ?
Car loan Information:
Calculate Car Loan EMI