Bajaj Pulsar NS200 and KTM 200 Duke comparison : बजाज पल्सर (Bajaj Pulsar) आणि केटीएम ड्यूक (KTM Duke) या तरुणांच्या आवडत्या बाइक्सपैकी (Bike) एक आहेत. बजाजने NS रेंजचे अनेक मॉडेल्स 2024 मध्ये लॉन्च केले आहेत. बजाजची Pulsar NS 200 देखील भारतीय बाजारात आली आहे. आता याच बाईकची तुलना आपण KTM 200 Duke शी करणार आहोत. या दोन्ही कंपन्यांच्या 2024 च्या मॉडेल्सबद्दल येथे जाणून घ्या.


Pulsar NS 200 आणि KTM 200 Duke ची रचना


बजाजने पल्सर NS 200 ची रचना त्यांच्या मागील जनरेशनप्रमाणे केली आहे. कंपनीने फक्त हेडलाईट डिझाईन बदलले आहे. बजाजने आपल्या हेडलाईट्समध्ये नवीन डीआरएल स्थापित केले आहेत. जे या बाईकला नवीन लूक देतात. KTM 200 Duke साठी अपडेट अजून येणे बाकी आहे. त्याची हेडलाईट मागील KTM 250 Duke प्रमाणेच ठेवण्यात आली आहे.


बाईकची वैशिष्ट्ये काय?


Pulsar NS 200 मध्ये दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. या बाईकला 17 इंची चाके आहेत. त्याचा कन्सोल पूर्णपणे डिजीटल उपकरणांनी सुसज्ज आहे. फोनला त्याच्या डॅशशीही जोडता येऊ शकते, जेणेकरून फोनवर येणाऱ्या सूचना डॅशवर दाखवता येतील.


KTM 200 Duke मध्ये Pulsar NS 200 सारखीच चाके आणि ब्रेक आहेत. तसेच, यात रेडियल-माउंटेड ब्रेक कॅलिपर बसविण्यात आले आहे, जे पल्सरच्या अक्षीय कॅलिपरपेक्षा चांगले आहे. परंतु, केटीएम ड्यूकमध्ये मूलभूत LCD डिजिटल कन्सोल आहे, जे खरेदीदाराच्या निवडीवर परिणाम करू शकते. केटीएमने 2012 मध्ये भारतीय बाजारपेठेत आपली बाईक आणली. 


Pulsar NS 200 आणि KTM 200 Duke ची एक्स-शोरूम किंमत किती?


दोन्ही बाईकमध्ये 199.5cc इंजिन आहे. जेथे NS200 36kmpl मायलेज देते. तर 200 Duke ला 34kmpl मायलेज मिळते. बजाजच्या पल्सर NS 200 ची एक्स-शोरूम किंमत 1,57,427 रुपये आहे. तर KTM 200 Duke ची एक्स-शोरूम किंमत 1,96,685 रुपये आहे. दोन्ही बाईक भारतीय बाजारपेठेत उत्तम लूक आणि मायलेजसह उपलब्ध आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :


Mahindra Thar : महिंद्रा थार आणि स्कॉर्पिओ आता नव्या अवतारात; किंमत आणि फीचर्स काय असतील?


Car loan Information:

Calculate Car Loan EMI