Santosh Juvekar On Vicky Kaushal: काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'छावा' सिनेमा (Chhaava Movie) गाजला. 2025 मधला सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमाचा टॅग 'छावा'नं आजवर स्वतःकडे ठेवला आहे. 'छावा'नंतर रिलीज झालेला एकही सिनेमा आजवर धमाकेदार कमाई करू शकलेला नाही. या सिनेमात विक्की कौशल मुख्य भूमिकेत होता. तर, इतर अनेक मराठी कलाकारांनीही मराठी सरदारांच्या, मावळ्यांच्या भूमिका साकारल्यात. त्यातील एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेला मराठी अभिनेता संतोष जुवेकर (Marathi Actor Santosh Juvekar). सिनेमा रिलीज होण्यापूर्वीपासूनच संतोष जुवेकर 'छावा' सिनेमामुळे चर्चेत होता. त्याच्या अनेक मुलाखतींचे व्हिडीओ व्हायरल होत होते. त्यापैकी एका व्हिडीओमुळे मात्र संतोष जुवेकरला ट्रोलिंगचं शिकार व्हावं लागलं होतं.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका मुलाखतीत बोलताना अभिनेता संतोष जुवेकरनं औरंगजेबाची भूमिका साकारण्याऱ्या अक्षय खन्नाबाबत एक वक्तव्य केलं होतं. मी औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाकडे बघितलंही नाही, असं संतोष जुवेकर म्हणाला होता. त्यानंतर मात्र, नेटकऱ्यांनी संतोष जुवेकरवर टीकेची झोड उठवली होती. या ट्रोलिंगवरुन यापूर्वीही संतोष जुवेकर व्यक्त झाला होता. पण, याबाबत आतापर्यंत सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Director Laxman Utekar) किंवा सिनेमातला लीड अॅक्टर विक्की कौशल (Vicky Kaushal) काय म्हणेल? असा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर याचं उत्तर स्वतः संतोष जुवेकरनं दिलं आहे. संतोषला जे ट्रोल करण्यात आलं, त्यावर विक्की कौशलची प्रतिक्रिया नेमकी काय होती? हे संतोष जुवेकरनं सांगितलं आहे.
संतोषला झालेल्या ट्रोलिंगवर विक्की कौशल नेमकं काय म्हणाला?
Zen एंटरटेनमेंटला दिलेल्या मुलाखतीत संतोष म्हणाला की, "आता मॅडॉकने 'छावा' सिनेमाच्या यशाचं सेलिब्रेशन आयोजित केलं होतं. तेव्हा मला लक्ष्मण सर आणि विक्की कौशल दोघेही भेटले. ते दोघेही मला भेटून अर्थात हसले. मग मला विक्की म्हणाला, तू माझ्यापेक्षाही जास्त लोकप्रिय झालास. संत्या या गोष्टी सोडून टाक. त्यांचा इतका विचार करु नकोस. तू काय आहे, कसा आहेस, माणूस म्हणून कसा आहेस हे तुझ्या जवळच्या लोकांना माहितीये. त्यामुळे त्यांच्याबद्दल विचार कर."
"जे लोक ट्रोलिंग करत आहेत, त्यांना माहित नाहीये. त्यामुळे त्यांच्याबद्दल इतका विचार करु नकोस. हे चालू राहिल. हे लोक बोलत राहणार, तू जर त्यांना उत्तर दिलंस तर ते अजून बोलणार. ते तुझ्या उत्तराचीच वाट बघत आहेत. त्यामुळेच मी कोणालाच उत्तर दिलं नाही.", असं संतोष जुवेकर म्हणाला.