- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Breaking LIVE Updates: योगेश कदम यांच्या आईचे नावे मुंबईत डान्सबार; अनिल परब यांचा गंभीर आरोप
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर...विधानभवनात हायव्होल्टेज ड्रामा, जितेंद्र आव्हाडांनी कार्यकर्त्यासाठी पोलिसांची गाडी अडवली,...More
नाशिक : राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅप प्रकरणी तपास यंत्रणा नाशिकमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. नाशिकमधील महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. विधिमंडळात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या संदर्भात पेन ड्राइव्ह दाखवत कारवाईची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील तपास यंत्रणा नाशिकमध्ये दाखल झाल्याचे समजते. हनी ट्रॅप प्रकरणात नाशिकच्या ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला, त्या ठिकाणी देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या चौकशी बाबतीत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
-
महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईचे नावे मुंबईत डान्सबार
आमदार अनिल परब यांचा कदम यांच्या वर गंभीर आरोप
कांदिवली येथील सावली बार हा ज्योती कदम यांच्या नावे
पोलिसांनी या बारवर धाड टाकली त्यावेळी २२ बारबाला देखील ताब्यात घेतल्याची अनिल परब यांची सभागृहाला माहिती
एकीकडे डान्सबारवर बंदी असताना हा डान्सबार सुरूच कसा??
अनिल परब यांचा सत्ताधारी पक्षाला सभागृहात सवाल
Nashik: नाशिकच्या शरणपूर रोड येथील तिबेटीयन मार्केट जवळ असलेल्या एका खाजगी हॉस्टेलमध्ये राहत्या खोलीत गळफास घेत 16 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे... ज्ञानेश्वरी शिरसागर असं आत्महत्या केलेल्या सोळा वर्षीय तरुणीचं नाव आहे... हे तरुणी मुळशी अहिल्यानगर ची रहिवाशी होती गेल्या दोन महिन्यापासून ती नाशिकच्या एका खाजगी होस्टेलमध्ये राहत होती...मागील दोन महिन्यांपासून ज्ञानेश्वरी या ठिकाणी राहत होती. तीने नीटच्या परीक्षेसाठी शहरात एका खासगी क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. तसेच ती अकरावीच्या वर्गात विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती.....सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शरणपूर येथील तिबेटियन मार्केटजवळ गौरव पार्क नावाची इमारत आहे. येथे फ्लॅटमध्ये मुलींसाठी असलेल्या वसतीगृहात ज्ञानेश्वरी राहत होती. ज्ञानेश्वरी हिने पंख्याच्या सहाय्याने ओढणीद्वारे गळफास घेतल्याचे आढळून आले....ही बाब लक्षात येताच अन्य विद्यार्थिनी व होस्टेल मालकाच्या मदतीने तिला बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून ज्ञानेश्वरीला मृत घोषित केले. तिच्या आत्महत्येमागील कारण समोर आलेले नाही. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद सरकारवाडा पोलिसांनी केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर व्यक्त केलेल्या रोशा विरोधात पोलीस बॉईज संघटना आक्रमक झालीय. रोहित पवार यांच्यावर 353 नुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी केली.
राजकीय परिवारात जन्म घेता म्हणून दादागिरीचे लायसन घेऊन येता का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. शरद पवार कधीच कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याला वाकड्या शब्दात बोलले नाही. मात्र रोहित पवार तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.. वारंवार पोलिसांना टारगेट केल्या जाणाऱ्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाणार आहे. तर मुंबईतील आझाद मैदानावर पोलीस बॉईज संघटनेकडून निदर्शने केली जाणार आहे.
मिरा-भाईंदर पालिकेला देशात प्रथम क्रमांकाचा ‘स्वच्छता’ पुरस्कार
स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये मिरा-भाईंदर महानगरपालिका देशभरातील २३ ते ४० लाख लोकसंख्या गटात प्रथम क्रमांकावर आली असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विज्ञान भवन, दिल्ली येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पालिकेला ५ स्टार कचरामुक्त शहर आणि वॉटर प्लस मानांकन ही विशेष राष्ट्रीय मान्यता देखील मिळाली आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे मिळालेले हे यश शहरासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
मुंबईमधील ३९ मराठी शाळा बंद.
गेल्या ६ वर्षात मुंबईतील ३९ मराठी शाळा पटसंख्या शून्य झाल्यामुळे बंद.
३९ बंद झालेल्या मराठी शाळांपैकी १४ शाळा ह्या दक्षिण मुंबईतील आहेत.
मुंबईमध्ये इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल वाढत असून मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचं राज्य शासनाने लेखी उत्तराद्वारे मान्य केलं आहे…
मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत आहे…
त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे…
पुण्यात पुन्हा हाणामारी
पुण्यातील पर्वती भागात 10 ते 12 जणांकडून तरुणाला बेदम मारहाण
पर्वती पोलीस स्टेशनमध्ये 9 जणांविरोधात गुन्हा दाखल
जुन्या वादातून तरुणाला टोळक्याकडून मारहाण
मारहाण करणारे आणि फिर्यादी युवक एकाच बिल्डिंगमध्ये वास्तव्यास असून गेल्या अनेक दिवसांपासून यांच्यामध्ये गाडी पार्किंग वरून वाद होता
गाडी पार्किंगच्या वादावरून परवा दिवशी रात्री या सर्व जणांकडून त्या तरुणाला मारहाण करण्यात आली
CCTV मध्ये तरुणांना झालेली मारहाण कैद
पोलिसांकडून सर्वांची चौकशी सुरू
बीड : ज्ञानेश्वरी मुंडे यांना जिल्हा रुग्णालयाच्या अति दक्षता विभागातून डिस्चार्ज
72 तासांच्या उपचारानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांना डिस्चार्ज
पती महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता
आता उपचारा नंतर प्रकृती स्थिर असल्याने मुंडेंना डिस्चार्ज देण्यात आला
- आदिवासी विभागातील उपायुक्त संगीता चव्हाण निलंबित
- संगीता चव्हाण यांनी मराठा समाजातील तरुणांना दिले होते आदिवासी प्रमाणपत्र
- आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली अधिवेशनात घोषणा...
- निलंबनाच्या कारवाईनंतर उपायुक्त संगीता चव्हाण यांचा माध्यमानसमोर बोलण्यास नकार...
- निलंबनाची कारवाई झाली याची अद्याप वरिष्ठानकडून माहिती नसल्याचं संगीता चव्हाण यांनी केले स्पष्ट...
- बोगस प्रमाणपत्रांसंदर्भात आदिवासी विकास भवनात उपायुक्तांची थेट विलंबन कारवाईने खळबळ...
“विधानभवनात काल झालेला प्रकार अत्यंत वाईट आहे हे अक्षम्य आहे, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलीय, अध्यक्षांनी याची गंभीर दखल घेतली आहे, कडक कारवाई करण्यात यावी ही सर्वांची भावना आहे.. हे सर्वसामान्यांचं कायदेमंडळ आहे… इथे सर्वसामान्यांना न्याय दिला जातो, या वास्तूचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे, माझी सर्वांना विनंती आहे” - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
काल ज्या प्रकारे गोंधळ झाला दोन्ही कार्यकर्ते दोन नेत्यांचे होते. आव्हाड्यांवर जर गुन्हा दाखल झाला असेल तर ते पोलिसांच्या दृष्टीने चूक वाटत असेल कारण त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याची बाजू लावून धरली. जितेंद्र आव्हाड ज्या प्रकारे आपल्या कार्यकर्त्याच्या बाजूने उभे राहिले ते वाखाण्याजोगे आहे...
विधानसभा अध्यक्षांकडे अहवाल येईल आणि काय तो निर्णय होईल
पण हक्क भंग समिती समोर हे सगळं प्रकरण गेलं पाहिजे आणि नियम बनवले पाहिजे
आव्हाड यांनी ज्या प्रकारे कार्यकर्त्यासाठी आंदोलन केलं ते एक प्रकारे त्यांनी त्यांची बाजू मांडली हे योग्य असल्याचं मिटकरी म्हणत आहेत...
जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल
सरकारी कामात अड़थळा आणल्यामुळे गुन्हा दाखल
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भास्कर जाधव यांनी अखेर आपली चूक मान्य केली
माझ्याकडून बाहेर जे शब्द गेले ते योग्य नाहीत
माझी चूक झाली मी ते कबूल करतो आणि मी माफी मागतो
भास्कर जाधव यांनी मागितली सभागृहाची माफी
सभागृहानेही भास्कर जाधवांना मोठ्या मनान केलं माफ
ढिगाऱ्याखाली अडकलेलं जखमींना बाहेर काढल्यानंतर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे
आज सकाळी सहाच्या सुमारास वन प्लस वन स्ट्रक्चर च्या असलेल्या घर कोसळला होता.
या ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकण्याची शक्यता आहे त्यांच्या शोध मोहीम देखील अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे
भाजप पक्षप्रवेशावेळी काँग्रेसच्या माजी आमदाराचे शुद्धीकरण..
पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या भाजप 16 तारखेला संजय जगताप यांचं भाजप पक्षप्रवेश पुणे जिल्ह्यातील सासवड येथील पालखी मैदानावर आयोजित करण्यात आलं होतं
पक्षप्रवेशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जगताप यांचे पक्षप्रवेश झाला ..
पक्षप्रवेशावेळी गुरुजींना मंत्र पठण करून काँग्रेस आमदाराचे शुद्धीकरण केल्याचं दिसत आहे
पक्षप्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सोशल माध्यमात सुरू आहे..
सफाई कर्मचा-यांसाठीचा लाड पागे समितीचा जीआर काढला समाज कल्याण विभागाने पण याची अंमलबजावणी नगरविकास विभाग करत नाहीय. हा जीआर म्हणजे पंचपक्वानाचे चित्र आहे. जबतक सूरच चांद रहेगा, तोवर हा प्रश्न राहिल. नगरविकास विभागाने अतिरिक्त पदे निर्माण करून सफाई कामगारांच्या वारसाना सेवेत घ्यायला हवे असे बोलत सफाई कामगारांच्या प्रश्नावर सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला सवाल केला आहे.
तर सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नवर अजित पवार यांनी उत्तर देत सांगितले की,
मुनगंटीवार तुम्ही भावनिक बोलता, पण तशी वेळ येवू देणार नाही. लवकरच याविषयी बैठक घेतली जाईल.
अनाथ मुलांच्या संदर्भात राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
अनाथ प्रवर्गातील मुला/ मुलींना शिक्षण आणि परिक्षा शुल्क पुर्णपणे माफ
८ लाखांच्या आत कुटुंबांच उत्पन्न असलेल्या मुल मुलींना या योजनेचा मिळणार लाभ
अनाथ बालकांना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून 100% शिक्षण आणि परीक्षा शुल्कात मिळणार सवलत
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे
दिव्यांगांच्या धरतीवर अनाथांना एक टक्का आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण राज्य सरकारचा निर्णय
शासकीय निमशासकीय शासकीय अनुदान असलेल्या संस्थांमध्ये योजना लागू राहणार
विदर्भात काल अनेक ठिकाणी झालेल्या पावसामुळे चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात वीज पडून तीन जणांचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात मकसूर येथे शेतात काम करताना रावबा मंगाम तर बोरगाव शिवमफळ येथे अशोक मोरे या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर नागभीड तालुक्यातील किटाळी बोरमाळा येथे अविनाश उईके या तरुण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे दुपारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात विज पडून राणी माहुरे आणि त्यांची मुलगी श्रद्धा माहुरे या जखमी झाल्या.
रोबर्ट वाड्रा यांच्याविरोधात दाखल आरोपपत्रावर राहुल गांधींची प्रतिक्रिया
राहुल गांधींची एक्स post
माझ्या मेहुण्याला गेल्या दहा वर्षांपासून या सरकारकडून त्रास दिला जात आहे. हे नवीन आरोपपत्र त्या छळवणुकीचा पाठपुरावा आहे.
मी रॉबर्ट, प्रियंका आणि त्यांच्या मुलांसोबत उभा आहे, कारण त्यांना पुन्हा एकदा द्वेषपूर्ण, राजकारणाने प्रेरित निंदानालस्ती आणि छळाचा सामना करावा लागत आहे.
मला माहित आहे की ते सर्व कोणत्याही प्रकारच्या छळाला तोंड देण्यासाठी पुरेसे धैर्यवान आहेत आणि ते सन्मानाने तसे करत राहतील.
अखेरीस सत्याचा विजय होईल
मी घटनेचं एकाच शब्दात वर्णन करतो
ये तो होना ही था
इतके पास देते कोण? रेल्वेने गर्दी इतकी नसते तेवढं अधिवेशनात गर्दी असते
सभागृहातून वाट काढत बाहेर यावं लागतं
पायऱ्या सेल्फी पाॅईंट झाल्या आहेत
अरे चाललंय काय हे?
पास इतक्या पैशांनी विक्री होतो हे आम्ही सांगितलं होतं
एकमेकांना भेदणं आणि मारहाण करत सेफ होणं हे विधानभवन बनेल
अशा प्रकारचे गैरवर्तन कधीही केलेले नाही
कधीही कोणाला सोबत आणलेलं नाही
आम्ही आमच्या घरची माणसं देखील गेटमधून आत आणली नाही
आझाद मैदान पोलीस ठाण्यात रोहित पवारांचा पारा चढला
रोहित पवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना ताब्यात घेतल्यानंतर आव्हाड आणि रोहित पवार यांनी गाठलं होत आझाद मैदान पोलीस ठाणे
पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये आरोपीकडून तोडफोड
सहकार नगर परिसरातील एका गुंडाने पोलीस स्टेशनमध्ये घातला राडा
पोलीस स्टेशन मध्ये गुंडाकडून तोडफोड
राजू उर्फ बारक्या लोंढे असं तोडफोड करणाऱ्या आरोपीचे नाव
पोलीस ठाण्यात तोडफोड करत खिडक्यांच्या फोडल्या काचा
कोंबिंग ऑपरेशन मध्ये सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेत त्याला सहकार नगर पोलिस स्टेशन मध्ये आणण्यात आलं होतं
याचवेळी सराईत गुन्हेगाराने पोलीस स्टेशनमध्ये राडा घातला असल्याची माहिती
पोलीस स्टेशन मधील कॉम्प्युटर देखील फोडलं
पुण्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात
द रजिस्टन्स फ्रंट ही संघटना अमेरिकेकडून दहशतवादी संघटना जाहीर
जम्मू - काश्मीरातील अनेक दहशतवादी कारवाया करण्यात रेजिस्टन्स फ्रंट आघाडीवर
पहलगाम हल्ल्याचा कट याच संघटनेकडून रचण्यात आला
द रजिस्टन्स फ्रंट लष्कर ए तैय्यबाचा भाग
भारताकडून अमेरिकेच्या निर्णयाचे स्वागत
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची सर्वोच न्यायालयात धाव
त्रिसदस्यीय समितीच्या शिफारशीविरोधात यशवंत वर्मा सर्वोच्च न्यायालयात
यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी पैशांच्या नोटा आढळल्या
त्याप्रकरणी माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी महाभियोगाची शिफारस केली आहे
आपलं म्हणणं संबंधित समितीने न ऐकताच ही शिफारस केली असा दावा करून यशवंत वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे
यशवंत वर्मा यांच्याविरोधात आगामी अधिवेशनात महाभियोग प्रस्ताव येण्याची शक्यता आहे
मारहाणीच्या घटनेनंतर काय घडलं?
१) आव्हाड कार्यकर्ते नितीन देशमुख आणि पडळकर कार्यकर्ते हृषिकेश टकले यांना विधान भवन परिसरात असलेल्या पोलिसांच्या खोलीत ठेवण्यात आले
२) दोन्ही कार्यकर्त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले
३) प्रत्यक्षदर्शी दोन्ही विधानभवनातील पोलिसांची साक्ष घेण्यात आली
४) मारहाणीच्या घटनेचे सभागृहात पडसाद उमटले त्यामुळे विधानसभा अध्यक्ष यांनी पोलिसांना तत्काळ वस्तुस्थिती मांडणारा अहवाल मागवला
५) जितेंद्र आव्हाड आपल्या कार्यकर्त्यांसह पोलिसांच्या खोलीत आले आणि नितीश देशमुखला घेऊन गेले यावेळी हृषिकेश देशमुख याला व्हीआयपी ट्रिटमेंट कशा प्रकारे देत आहे हे माध्यमांच्या लक्षात आणून दिलं (पोलीस टकलेला तंभाखू खायला घेऊन गेले होते)
६) ९ वाजता विधिमंडळत अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आला
७) अहवालात दोन्ही बाजूने दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याची बाब समोर आली
८) जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला सचिव जितेंद्र भोळे यांनी अधिवेशन संपल्यानंतर दोघांना सोडण्यात येईल असं सांगितलं मात्र प्रत्यक्षात नितीश देशमुख याला थांबवून ठेवण्यात आलं
९) विधानसभा अध्यक्षांनी माध्यमाशी बोलताना दोघींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं
१०) रात्री उशिरा साडे बारा वाजता नितीन देशमुख याला पोलीस घेऊन जाण्यास निघाले मात्र जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी गाडी रोखली आणि आंदोलन सुरू केलं यावेळी रोहित पवार देखील आंदोलनात पोहोचले
११) नितीन देशमुख याला मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोलीस घेऊन गेले आणि त्याच्यावर आणि हृषिकेश टकलेवर गुन्हा दाखल करण्यात आला
१२) या दोघांना सध्या कुठे ठेवले आहे याबाबत सध्या तरी काहीच माहिती नाही
विधान भवनात झालेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांनी केली कारवाई
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गुन्हा दाखल होताच दोघांना अटक
रात्री उशिरा नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
रात्रीच दोघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती
पुण्यात महापालिकेच्या सेवकाला स्थानिका कडून मारहाण करत शिवीगाळ
पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील सेवकाला स्थानिक नागरिका कडून बांबूने मारहाण करत करण्यात आली शिवीगाळ
पुण्यातील ढोले पाटील रोड परिसरात घडली घटना
ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कार्यरत असलेल्या हनुमंत लोंढे या स्वच्छता कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण
किरकोळ कारणावरून वाद घालत स्थानिक नागरिकांनी शिवगड केल्याचा कर्मचाऱ्याचा आरोप
महानगरपालिका कर्मचाऱ्याने पुणे पोलिसांकडे केली तक्रार
रात्री सफाई करत असताना कर्मचाऱ्यांच्या हातातील झाडू लागल्याने त्याच परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी रागात शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार
पुणे: 20 जुलै रविवारी ‘पुणे-सोलापूर इंटरसिटीएक्सप्रेस’ एक दिवसासाठी रद्द
पुणे-दौंड सेक्शनमधील हडपसर रेल्वे स्थानाकावर पायाभूत सुविधाच्या कामामुळे घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द
दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाकडून व्यवस्था
सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, कुर्डुवाडी या चार आगारातून पुण्यासाठी एकूण 40 अतिरिक्त बसेस सोडले जाणार
रेल्वे रद्द असताना प्रवाशांना दुसरा पर्याय मिळाल्याने काहीसा दिलासा
या ब्लॉकमुळे सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेससह पुणे हरंगुळ एक्सप्रेस तसेच काही विशेष गाड्या देखील रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत
अक्कलकोट बंदच्या पार्श्वभूमीवर दहा पोलीस अधिकारी दीडशे पोलीस कर्मचारी तैनात .. यामध्ये क्विक रिस्पॉन्स टीम आणि रॅपिड ऍक्शन फोर्स महिन्यात करण्यात आले आहे ..
अक्कलकोट मधील काही शिक्षण संस्था बंद असून ज्या सुरू आहे तेथेही मुलांची उपस्थिती कमी आहे ..
अक्कलकोट ची एसटी वाहतूक मात्र नियमितपणे सुरू आहे
पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला गती; शेतकऱ्यांना चौपट मोबदला
पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचा तिढा सुटला आहे.. शेतकऱ्यांना चौपट मोबदला आणि दहा टक्के जमीन परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासोबतच बाधित शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नोकरी व व्यवसाय प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विकास महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या २०१९च्या पुनर्वसन धोरणानुसार भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे....पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ती लवकर पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अनधिकृत होर्डिंग बाबत खोटी माहिती दिल्याने पालिका आयुक्तांनी केली अधिकाऱ्यांवर कारवाई
पालिका आयुक्ताने अनधिकृत होर्डिंग ची माहिती मागवली असताना अहवाल न देता माहिती देण्यात आली
नगर रस्त्या वडगाव कालचेरी क्षेत्रीय कार्यालयातील परवाना निरीक्षक विनोद लांडगे याला सेवेतून निलंबित करण्यात आला आहे
राजेंद्र तिरुपती याला लेखी अहवाल न देता आल्याने एक वेतन वाढ रोखण्यात आलेली आहे
क्षेत्रीय कार्यालयातीलअनेक अधिकाऱ्याने अनधिकृत होर्डिंग बाबत चुकीची माहिती दिल्याने आता सर्वांना लेखी नोटीस देण्यात आली आहे.
महिलांना रूढी पूर्तीच्या जाळ्यातून बाहेर काढून त्यांना मोकळं रान द्यावे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन
आपल्या देशातील 142 कोटी समाज जेव्हा देशासाठी कार्य करेल तेव्हा देशाचा विकास होईल, देशाचे भाग्य बदलेल.
केवळ मूठभर लोकं काम करतील तर त्यामुळे देशाचे भाग्य बदलणार नाही.
महिला घटक उभारणे गरजेचे आहे, कारण त्याच देशाचे भाग्य बदलू शकतात.
सोलापुरातील उद्योगवर्धिनी या महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त मोहन भागवत सोलापुरात आले होते.
Mira Roda News : मिरा रोड येथे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होत आहे. 8 जुलै रोजी पोलीसांचा बंदी आदेश झुगारून मनसे सैनिकांनी आणि मराठी नागरिकांनी उत्सफुर्त मोर्चा काढला होता. आणि त्याच अनुषंगाने मनसेसैनिक आणि मराठी नागरिकांना शाबासकी ची थाप देण्यासाठी राज ठाकरे आज मिरा रोड येथे येत आहेत. मुंबईची लाईफलाईन रेल्वेत ही राज ठाकरेंच्या आजच्या सभेची चर्चा आहे.
Jitendra Awhad vs Gopichand Padalkar : महाराष्ट्रातील सामान्य जनतेला आपल्या लोकप्रतिनिधींची लाज वाटेल असा आणखी एक प्रकार आज घडला. तो सुद्धा विधानभवनात.. सत्ताधारी पक्ष भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांचे विश्वासू आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनाच्या दारात काल शिविगाळ केली-धमक्या दिल्या. त्यांचे समर्थक वरताण निघाले, त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या विधानभवनाच्या लॉबीत हाणामारी केली.
Jitendra Awhad vs Gopichand Padalkar : महाराष्ट्राचं राजकारण आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलंय. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या शिविगाळीनंतर आता त्याचा दुसरा अध्याय काल संध्याकाळी विधान भवनात दोघांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीत दिसला. त्यानंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीडवाजेपर्यंत विधान भवनात उमटले. जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जात असल्यामुळे आव्हाड संतापले आणि त्यांनी मध्यरात्रीच विधान भवनाच्या गेटवर आंदोलन केलं. सरकारविरोधात आणि पोलिसांविरोधात आव्हाडांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यामुळे आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवण्यासाठी थेट जीपसमोर आडवं पडून आंदोलन सुरू केलं. अखेर पोलिसांची जीप अडवून बसलेल्या आव्हाडांना पोलिसांनी अक्षरशः मागे खेचून काढलं. आव्हाडांच्या आंदोलनावेळी रोहित पवारही उपस्थित होते. मारहाण आणि देशमुखांना ताब्यात घेण्याचा त्यांनीही निषेध केलाय. दरम्यान काल रात्री उशिरा नितीन देशमुखला पोलीस घेऊन गेले मात्र कोणत्या पोलीस स्टेटशनला घेऊन गेले हे कळू शकलं नाही तर दुसरा आरोपी हृषीकेश टकले याची सेंट जॉर्ज रुग्णालयात रात्री ३ वाजता मेडिकल चाचणी करण्यात आलीये
Jitendra Awhad vs Gopichand Padalkar: महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आपल्या लोकप्रतिनिधींची लाज वाटेल, असा आणखी एक प्रकार विधानभवनात घडला. सत्ताधारी पक्ष भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांचे विश्वासू आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनाच्या दारात काल शिविगाळ केली, एकमेकांना धमक्याही दिल्या. त्यातच त्यांचे समर्थक वरताण निघाले, त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या आणि विधानभवनाच्या लॉबीत तुफान हाणामारी केली. एवढंच पुरेस नव्हतं, तर मध्यरात्रीच्या सुमारास विधान भवनाच्या गेटवर हायव्होल्टेज राडा झाला.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE Updates: योगेश कदम यांच्या आईचे नावे मुंबईत डान्सबार; अनिल परब यांचा गंभीर आरोप