Mahindra Thar : भारतीय ऑटोमोबाईल (Automobile) कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) त्यांच्या प्रसिद्ध एसयूव्ही थार आणि स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये (Scorpio Classic) एक नवीन रंग प्रकार सादर केला आहे. पूर्वी चार रंगात येणारा थार आता पाच वेगवेगळ्या रंगात येणार आहे, तर स्कॉर्पिओ जी तीन रंगात येत होती ती आता चार रंगात येणार आहे. या बदलानंतर दोन्ही वाहनांना स्टेल्थ ब्लॅक कलरचा पर्याय मिळाला आहे जो नेपोलियन ब्लॅकची जागा घेईल.


नवीन कलरमध्ये काय खास आहे?


महिंद्रा अँड महिंद्रा : नवीन बदलानंतर आता महिंद्रा थार आणि स्कॉर्पिओच्या बाहेरील कलरला नवा पर्याय मिळाला आहे. महिंद्रा थार 3-डोअर आता 5 कलर व्हेरियंटमध्ये येईल - रेड रेज, डीप ग्रे, स्टेल्थ ब्लॅक, एव्हरेस्ट व्हाइट आणि डेझर्ट फ्युरी. दुसरीकडे, Scorpio Classic मध्ये Galaxy Grey, Everest White, Stealth Black आणि Molten Red Rage असे पर्याय आहेत. महिंद्राची उर्वरित वाहने जसे की XUV700, XUV300, Scoripo N इत्यादी नेपोलियन ब्लॅक बाह्य पेंटमध्ये येतील.


Scorpio Classic SUV ची किंमत आणि वैशिष्ट्ये


Scorpio Classic SUV ची किंमत 13.59 लाख ते 17.35 लाख रुपये (एक्स-शोरूम किंमत) दरम्यान आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक भारतात लोकप्रिय SUV ची अद्ययावत आवृत्ती म्हणून लॉन्च करण्यात आली. कंपनीची ही SUV ट्रिम S आणि S 11 या दोन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच, एसयूव्हीला व्हर्टिकल स्लॅट्स, नवीन प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील देखील देण्यात आले आहेत.


पाच डोरच्या थार लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे
थारप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी सध्या पाच दरवाजांच्या थारवर काम करत आहे जी लवकरच तीन-दरवाज्यांच्या थारसह लॉन्च केली जाईल. या थारची स्पर्धा मारुती सुझुकी जिमनीशी आहे. सध्या पाच दरवाजांच्या थारची रोड टेस्टिंग सुरू आहे. ते लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Engine Overheat : इंजिन जास्त गरम होऊन गाडी मध्येच बंद पडली तर काय कराल? आधी 'हे' काम करा


Car loan Information:

Calculate Car Loan EMI