Jitendra Awhad and Gopichand Padalkar: महाराष्ट्राच्या विधानसभेला नव्हे, तर महाराष्ट्र संस्कृतीलाच काळीमा फासण्याचा प्रकार काल विधानसभेच्या प्रांगणात घडला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा अट्टल मवाली कार्यकर्त्याने जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखावर केलेल्या हल्ल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. या हाणामारीनंतर मध्यरात्री सुद्धा अभूतपूर्व राडा झाला. नितीन देशमुख यांना मारहाण होऊनही त्यांनाच पोलीस अटक करणार असल्याचे समोर येताच जितेंद्र आव्हाड प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी थेट पोलिसांच्या गाडीखाली ठिय्या मांडला. तब्बल एक तास त्यांनी पोलिसांची गाडी रोखून धरली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अक्षरश: मागे खेचत नितीन देशमुख यांना पोलीस गाडीतून घेऊन गेले. या सर्व राड्यानंतर पुन्हा एकदा मार खाणाऱ्याला पोलीस अटक करत आहेत असा प्रति हल्ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे.
वाह रे सरकारचा न्याय?
राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत या सर्व घडामोडींवर अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की त्यांनी वाह रे सरकारचा न्याय ? काल विधानभवनात जे गुंड आमचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी आणले गेले होते. त्यांनी आमचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केली. व्हिडिओ मध्ये सगळं दिसतंय मारहाण करण्यासाठी इशारा कोण देतंय ? किती गुंड आहेत ? कुणाला मारलं जातंय ? पण पोलिसांनी ताब्यात घेतले कुणाला? तर मार खाणाऱ्या नितीन देशमुख यांना. बाकी गुंड मोकाट? जितेंद्र आव्हाड साहेबांनी नितीन देशमुख यांना सोडण्यासाठी आंदोलन पुकारलं आहे. सरकार त्यांच्या सोबतही क्रूरपणे वागत आहे. सरकारने नितीन यांना तत्काळ सोडावे नाहीतर आम्ही समजू की हा हल्ला घडविण्यात सरकार पण सामील होते.
इतर महत्वाच्या बातम्या