Autonomous Emergency Braking Working Process: ऑटोनॉमस एमर्जन्सी ब्रेकिंग किंवा AEB हे कारमधील एक अ‍ॅक्टीव्ह सेफ्टी फिचर (Safety Features) आहे, जे आपत्कालीन परिस्थितीत स्वयंचलितपणे ब्रेक (Automatic Brake) लागू करते. कार उत्पादक AEB साठी वेगवेगळ्या नावांचा वापर करतात. ब्रेकिंग, ब्रेक असिस्ट, ब्रेक सपोर्ट इ. या सर्वांचं काम एकच असलं तरी, नावाप्रमाणेच ही ऑटोमॅटिक ब्रेकिंग सिस्टीम आहे. आपात्कालीन परिस्थितीत हे सेफ्टी फिचर ड्रायव्हरला मदत करते.


ही प्रणाली मार्गातील अडथळे (पादचारी रस्ता, वाहने इ.) शोधते आणि आपोआप ब्रेक लावते किंवा ड्रायव्हर अपुरे ब्रेक मारत असल्यास ब्रेकिंग फोर्स वाढवते. संभाव्य टक्कर टाळण्यासाठी, AEB गाडीचा वेग कमी करू शकते आणि वेगानुसार वाहन थांबवू शकते. हे एक अत्यंत कार्यक्षम सुरक्षा वैशिष्ट्य आहे, कारण ते ड्रायव्हरला मदत करते. मेक आणि मॉडेलच्या आधारावर या ब्रेकिंग सिस्टम वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात, त्यापैकी काही प्रमुख खालीलप्रमाणे आहेत.


फॉरवर्ड एमर्जन्सी ऑटोमेटिक ब्रेकिंग


ही एक अशी सिस्टीम आहे, जी AEB फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग (FCW) प्रणालीसोबत काम करते. FCW डॅशबोर्डवरील ध्वनी किंवा दृश्यमान सूचकाद्वारे ड्रायव्हरला सतर्क करते. साधारणपणे, AEB सुरू होण्यापूर्वी FCW सक्रिय होते. प्रथम, FCW ड्रायव्हरला समोरील अडथळ्याबद्दल चेतावणी देते आणि जर ड्रायव्हर योग्य ते पाऊल उचलण्यात अयशस्वी झाला, तर स्वयंचलित ब्रेकिंग सिस्टम (AEB) हस्तक्षेप करते.


रियर इमरजेंसी ऑटोमेटिक ब्रेकिंग


ही एक अशी सिस्टीम आहे, जिथे कार मागच्या दिशेला नेताना कोणताही अडथळा आढळल्यास AEB सक्रिय होते. हे एक उत्तम सेफ्टी फिचर आहे. काही वाहनांमध्ये, मागील AEB मागील क्रॉस-ट्रॅफिक अलर्टसह कार्य करते, जे तुमची कार मागे येताना मागे उभ्या असलेल्या वाहनांची हालचाल ओळखते. पार्किंगच्या ठिकाणी रिव्हर्स ऑटोमॅटिक ब्रेकिंगमध्ये हे खूप उपयुक्त आहे.


पादचारी AEB


ही सिस्टीम फॉरवर्ड AEB सारखीच आहे, AEB फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग (FCW) सिस्टीमसोबत काम करते. हे पादचारी, सायकलस्वार आणि अगदी मोठ्या प्राण्यांचा शोध घेण्यास सक्षम आहे. FCW ला वाहनासमोर पादचारी आढळल्यास, चालकाने ब्रेक लावला नसला तरीही AEB गाडीचा वेग कमी करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी ब्रेक लावते.


सिटी स्पीड AEB


नावाप्रमाणेच, ही सिस्टीम शहरांमध्ये, अवजड वाहतूक किंवा पार्किंगच्या ठिकाणी टक्कर टाळते. दुसऱ्या शब्दांत ही यंत्रणा कमी वेगाने काम करते. उदाहरणार्थ, जर तुम्ही बंपर-टू-बंपर ट्रॅफिक असलेल्या रस्त्यावर गाडी चालवत असाल आणि जर तुम्ही वेळेत ब्रेक लावू शकला नाही तर AEB-सिटी गाडीला मागून धडकण्यापासून वाचवू शकते. शहरात वाहन चालवणाऱ्यांसाठी हे अतिशय उपयुक्त सेफ्टी फिचर आहे.


हायवे स्पीड AEB


या सिस्टिमध्ये, AEB हाय स्पीडने काम करते, विशेषतः महामार्गावर वाहन चालवताना. AEB-हायवे सिस्टीम पुढे अडथळे शोधण्यासाठी अधिक अ‍ॅडव्हान्स सेन्सर वापरते. ही यंत्रणा टक्कर होण्यापूर्वी कारचा वेग शक्य तितका कमी करू शकते, परंतु वाहन थांबवू शकत नाही. त्यामुळे, AEB सक्रिय असतानाही, टक्कर टाळण्यासाठी चालकाने लक्ष देणं आवश्यक आहे.


हेही वाचा:


New Car: स्वस्त झाली 'ही' पॉप्युलर कार; कंपनीने लाँच केलं नवं मॉडेल


Car loan Information:

Calculate Car Loan EMI