Skoda Slavia Price: प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी स्कोडाने (Skoda) त्यांच्या स्कोडा स्लाव्हिया (Skoda Slavia) कारचं मॅट एडिशन अधिकृतपणे भारतात लाँच केलं आहे. तथापि, या कारच्या किंमतीचा सविस्तर तपशील अद्याप उघड झालेला नाही. या लाँचसह ऑटोमेकरने सेडानच्या टॉप-एंड प्रकारांमध्ये नवीन वैशिष्ट्यं (New Features) सादर केली आहेत. याशिवाय, अपडेट केलेल्या स्लाव्हिया रेंजवर मर्यादित कालावधीसाठी फेस्टिव्हस ऑफर देण्यात आली आहे.
स्कोडा स्लाव्हिया बेस व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत रु. 10.89 लाख (एक्स-शोरूम) आहे, जी तिच्या सामान्य किंमतीपेक्षा 50 हजार रुपये कमी आहे.
मॅट एडिशन आणि इंजिन
नवीन स्कोडा स्लाव्हिया मॅट एडिशनला त्याच्या स्टँडर्ड व्हेरियंटपेक्षा वेगळे डिझाईन देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. नवीन व्हेरिंटला मॅट-फिनिश कार्बन स्टील कलर स्कीम आणि विंग मिरर आणि डोअर हँडलवर ग्लॉस ब्लॅक अॅक्सेंट मिळतात.
त्याच वेळी, बंपर गार्निश, फ्रंट ग्रिल आणि विंडो लाइनिंगवरील क्रोम फिनिश अबाधित आहे. मॅट एडिशन 1.0L TSI आणि 1.5L TSI टर्बो पेट्रोल इंजिन या दोन इंजिन पर्यायांसह ही कार ऑफर केली आहे.
मायलेज
-- 1.0 लिटर MT: 19.47 किलोमीटर प्रति लीटर
-- 1.0 लिटर AT: 18.07 किलोमीटर प्रति लीटर
-- 1.5-लिटर MT: 18.72 किलोमीटर प्रति लीटर
-- 1.5-लिटर DCT: 18.41 किलोमीटर प्रति लीटर
फिचर्स
स्लाव्हियाच्या उच्च शैलीतील ट्रिममध्ये आता ड्रायव्हर आणि सह-ड्रायव्हर दोघांसाठी इलेक्ट्रिक सीट एडजस्टमेंट, प्रकाशित फूटवेल एरिया आणि बूटमध्ये सबवूफर आहे.
कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास, यात 10.1-इंच टचस्क्रीन, 8-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जिंग, सनरूफ, ऑटो क्लायमेट कंट्रोल, हवेशीर फ्रंट सीट्स, 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग आणि मागे पार्किंग सेन्सर्स सारखी वैशिष्ट्यं आहेत.
स्कोडा लवकरच लाँच करणार इलेक्ट्रिक कार
सध्या इलेक्ट्रिक कार जगभरात लोकप्रिय होताना दिसत आहेत. भारतातही इलेक्ट्रिक कारची मागणी वाढू लागली आहे, त्यामुळेच अनेक भारतीय कंपन्यांनी कमी किंमतीत इलेक्ट्रिक कार बाजारात आणल्या आहेत. इलेक्ट्रिक कार एवढ्या स्वस्त झाल्या आहेत की, आता आपण 8 ते 10 लाख रुपयांपर्यंत चांगल्या रेंजची इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकता. यातच आता, स्कोडा ऑटो देखील भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात आपलं नशीब आजमावण्याच्या तयारीत आहे.
भारतासाठी आपण लवकरच मास मार्केट इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहोत, अशी घोषणा कंपनीने केली. मिळालेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक कारची किंमत 20 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते.
हेही वाचा:
Used Car Buying Tips: सेकेंड हँड कार खरेदी करताना नाही लागणार चुना; फक्त लक्षात ठेवा 'या' गोष्टी
Car loan Information:
Calculate Car Loan EMI