Upcoming Cars from Hyundai and Maruti Suzuki : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि ह्युंदाई (Hyundai मोटर इंडिया या भारतातील कार कंपन्या या वर्षी काही नवीन कार लाँच करणार आहेत. मारुती सुझुकी 2024 ची पहिली ऑफर म्हणून नवीन जनरेशन स्विफ्ट हॅचबॅक आणि नेक्स्ट जनरेशन डिझायर कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय वॅगनआर फेसलिफ्टही येत्या काही महिन्यांत लाँच होणार आहे. ह्युंदाईने या वर्षी अपडेटेड  क्रेटासह सुरुवात केली आहे. यानंतर ह्युंदाई 2024 च्या मध्यापर्यंत क्रेटा एन लाइन आणि अल्काझार फेसलिफ्ट लाँच करणार आहे. येथे आगामी नवीन कारची माहिती देण्यात आली आहे.


New-Gen Maruti Swift 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, New-Gen Maruti Swift एप्रिलमध्ये लाँच होईल. या हॅचबॅककारला नवीन झेड सीरिजपेट्रोल इंजिनसह चांगले डिझाइन आणि इंटिरिअर मिळेल. नवीन 1.2 लीटर पेट्रोल इंजिन माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजी मिळणार आहे. जे जास्तीत जास्त 82bhp पॉवर आणि 108Nm  टॉर्क जनरेट करते. 


मारुती वॅगनआर फेसलिफ्ट (Maruti WagonR Facelift)


मारुतीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक असलेल्या वॅगनआरला येत्या काही महिन्यांत मिड लाईफ अपडेट मिळणार आहे. 2024 मारुती वॅगनआरमध्ये होरीजेंटल प्लास्टिक क्लेडिंग इन्सर्ट आणि रिपोझिशन रिफ्लेक्टरसह थोडा अपडेटेड रिअर बंपर असेल. केबिनमध्ये अपग्रेड अपेक्षित असले तरी वॅगनआर फेसलिफ्टमध्ये सध्याच्या 1.0-लीटर आणि 1.2-लीटर पेट्रोल इंजिनचा होणार आहे. 


ह्युंदाई क्रेटा एन लाइन (Hyundai Creta N Line)


ह्युंदाई क्रेटा एन लाइन ही क्रेटा एसयूव्हीची स्पोर्टी व्हर्जन असून 2024च्या मध्यापर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. ह्युंदाईच्या इतर एन लाइन मॉडेल्सप्रमाणेच क्रेटा एन लाइनमध्ये फ्रंट ग्रिल, बंपर आणि रेड एक्सेंट्स मिळतील. यात ग्लॉस ब्लॅक आणि फॉक्स क्रॅश अॅल्युमिनियम एलिमेंट्स देखील मिळतील. स्पोर्टियर क्रेटामध्ये नवीन 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल जे 160PS  आणि 253Nm जनरेट करते, 6-स्पीड मॅन्युअल किंवा 7-स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडले जाते. 


ह्युंदाई अल्काझार फेसलिफ्ट (Hyundai Alcazar facelift)


ह्युंदाई अल्काझार फेसलिफ्टचे डिझाइन एक्सटर मायक्रो एसयूव्ही आणि अपडेटेड क्रेटासाखली असेल. यात नवीन डिझाइन लँग्वेज, ग्रिल आणि बंपर आणि इंटिग्रेटेड डीआरएलसह अपडेटेड हेडलॅम्प क्लस्टरसह मोठ्या प्रमाणात अपडेटेड फ्रंट एंड मिळेल. नवीन ह्युंदाई अल्काझरमध्ये नवीन अलॉय व्हील्स आणि LED  टेललॅम्प्स देखील मिळू शकतात. याचे इंजिन सेटअप प्री-फेसलिफ्ट मॉडेलप्रमाणेच ठेवण्यात येणार आहे.


इतर महत्वाची बातमी-


Hero Electric 2/3 Wheeler Hero Surge : इलेक्ट्रिक स्कूटरची तीन मिनिटांत थेट थ्री व्हिलर; हिरोच्या 'या' गाडीची चांगलीच चर्चा


 

 

 

Car loan Information:

Calculate Car Loan EMI