Hero Electric 2/3 Wheeler Hero Surge : हिरो कंपनी (HERO) आपल्या बाईक्समध्ये नवनवे प्रयोग करत असतात. त्यात हिरोच्या बाईक्स बजेटफ्रेंडली असल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये या बाईक्सची क्रेझ दिसते मात्र आता हिरोच्या टू-इन-वनने सर्वांनाच आकर्षित केलं आहे. ही बाईक  टू-व्हिलर आणि थ्री-व्हिलर  वाहनांचे कॉम्बिनेशन आहे. आपल्याला आपल्या सोयीनुसार आपण  टू-व्हिलर किंवा थ्री-व्हिलर वापरु शकतो. ही भन्नाट गाडी नेमकी कशी आहे? या गाडीची किंमत किती आहे? आणि गाडीचे फिचर्स कसे आहेत? पाहूयात...


केवळ तीन मिनिटांत थ्री व्हिलरची टू व्हिलर



सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये ही गाडी नेमकी कशी आहे दिसत आहे. या अनोख्या थ्री व्हीलरची टू व्हिलर होण्यासाठी साधारण तीन मिनिटांचा वेळ लागतो. ही थ्री व्हीलरची टू व्हिलरमध्ये कन्व्हर्ट होताना पाहताना अनेकजण आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहे. सध्या हिरोच्या या गाडीची चांगलीच चर्चा सुरु आहे. 


नाव आहे surge?



हिरोने या अनोख्या  गाडीला सर्ज असे नाव दिले आहे. जे सर्ज एस 32 सीरिजचा भाग आहे. हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील पहिले शिफ्टिंग वाहन ठरले. ज्याचा वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारे वापर केला जाऊ शकतो. मात्र हिरोने या अनोख्या टू आणि थ्री व्हीलरची किंमत किंवा ती किती वेळात लाँच होताना दिसेल याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.  


पॉवर पॅक आणि फिचर्स


हे दोन्ही थ्री व्हीलरची टू व्हिलर प्रकारात वेगळे असेल. म्हणजेच दुचाकी म्हणून याचा वापर केला तर तो 3kW पॉवर कॅपेसिटीने काम करेल. जे 3.5kWh  बॅटरी पॅकमधून उपलब्ध असेल आणि त्याचा टॉप स्पीड 60 किमी प्रति तास असेल.  त्याचबरोबर त्याचा वापर तीनचाकी वाहन म्हणून केला जाणार आहे. यात 11 किलोवॅटचा बॅटरी पॅक असेल, जो 10 किलोवॅटची पॉवर देईल.


 एका बटनने होणार दोन वेगळे भाग 
 


एक बटण दाबल्याने, फ्रंट विंडशील्ड भाग उभा उचलला जातो, ज्यामुळे आत इलेक्ट्रिक स्कूटर बनते. थ्री डब्ल्यू वाहनाच्या केबिनमध्ये बदल होतो. स्प्रिंग-लोडेड डबल-स्टँड टेक्नॉलॉजी देण्यात आली. आता थ्रीडब्ल्यू वाहनाच्या केबिनमधून वेगळ्या झालेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्वत:चे एलईडी हेडलाइट्स, टर्न इंडिकेटर, स्पीडो आणि स्विचगिअर देण्यात आले आहेत.






इतर महत्वाची बातमी-


Tata Curvv Diesel : टाटा कर्व्ह एसयूव्ही डिझेल इंजिनसह येण्याची शक्यता; इलेक्ट्रिक मॉडेल 'या' वर्षी लाँच होणार


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI