मुंबई  : टाटा मोटर्स (TATA Motors) या  (Auto News) भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह कंपनीने आज भारतातील पहिल्‍या एएमटी सीएनजी कार्स - टियागो  (CNG AMT Tata Tiago) आणि टिगोर आयसीएनजी एएमटीच्‍या (CNG AMT Tata Tigor) लाँच करण्यात आली आहे. 28.06 किमी/तासच्‍या  मायलेजसह या कार्स टियागो आयसीएनजीसाठी 7.89 लाख रूपये आणि टिगोर आयसीएनजीसाठी  8.84  लाख रूपये (एक्‍स-शोरूम दिल्‍ली) या सुरूवातीच्‍या किमतींमध्‍ये उपलब्‍ध असतील. सध्याच्या कलर पॅलेटमध्‍ये आणखी काही कलर उपलब्ध करुन दिले आहेत. कंपनी टियागोमध्‍ये टोर्नेडो ब्‍ल्‍यू, टियागो एनआरजीमध्‍ये ग्रासलॅण्‍ड बेज आणि टिगोरमध्‍ये मेटेअर ब्राँझ या आकर्षक नवीन कलरमध्ये लॉंच केल्या आहे. अनेकांना या दोन्ही कारची प्रतिक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे.  


Tiago iCNG AMT आणि Tigor iCNG AMT किंमत


Tiago iCNG AMT  एक्सटीए व्हेरियंटची किंमत 7,89,900 रुपये (एक्स-शोरूम), एक्सझेडए+ व्हेरिएंटची किंमत 8,79,900 रुपये, एक्सझेडए + डीटी व्हेरिएंटची किंमत 8,89,900 रुपये (एक्स-शोरूम) आणि एक्सझेडए एनआरजी व्हेरिएंटची किंमत 8,79,900 रुपये आहे. Tigor iCNG AMT च्या एक्सझेडए व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 8,84,900 रुपये आणि एक्सझेडए+ व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 9,54,900 रुपये आहे.


Tiago iCNG AMT आणि Tigor iCNG AMTचे इंजिन आणि पॉवर कसं आहे?


टाटा टियागो आयसीएनजी आणि टाटा टिगोर आयसीएनजीमध्ये 1.2 लीटर रेव्होट्रॉन इंजिन आहे जे 6000 RPM 73.4 पीएस पॉवर आणि 3500  आरपीएमवर 95 nM टॉर्क जनरेट करते. कारच्या फ्रंटमध्ये डिस्क ब्रेक आणि रियरमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. टियागोमध्ये इंडिपेंडंट, लोअर विशबोन, मॅकफर्सन (ड्युअल पाथ) स्ट्रूट टाइप सस्पेंशन आणि रियर ट्विस्ट बीम असून मागील बाजूस हायड्रोलिक शॉक शोषकावर कॉइल स्प्रिंग बसविण्यात आले आहे. टिगॉरच्या पुढील बाजूस स्वतंत्र, लोअर विशबोन, कॉइल स्प्रिंगसह मॅकफर्सन स्ट्रट सस्पेंशन आणि मागील बाजूस ड्युअल पाथ स्ट्रटसह अर्ध-स्वतंत्र, क्लोज्ड प्रोफाइल ट्विस्ट बीम सस्पेंशन आहे. या दोन्ही कार 28.06 किमी प्रति किलो सीएनजीचे मायलेज देतात. अनेक कार प्रेमींना या दोन्ही कारची प्रतिक्षा होती. अखेर ती प्रतिक्षा संपली आहे. दोन्ही कार लॉंच करण्यात आल्या आहेत. 


इतर महत्वाची बातमी-



Car loan Information:

Calculate Car Loan EMI