Tata Nexon : टाटा मोटर्स आपल्या सध्याच्या (Auto News) मॉडेल्समध्ये (Tata Nexon)सातत्याने सीएनजीचा पर्याय जोडत आहे. टियागो आणि टिगोर सीएनजी मॉडेल सादर (TATA Motors) केल्यानंतर आता टाटा मोटर्स नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे सीएनजी व्हर्जन सादर करण्याच्या तयारीत आहे. नुकतीच दिल्लीत झालेल्या 2024 इंडिया मोबिलिटी शोमध्ये ही कार सादर करण्यात आली होती.
या वर्षी लाँच होणार?
नेक्सॉन सीएनजी व्हर्जन ही या सेगमेंटमधील पहिली टर्बो-पेट्रोल सीएनजी कार असेल आणि ती मारुती ब्रेझा सीएनजीला टक्कर रदेईल. लाँचिंगची नेमकी तारीख किंवा त्यासंदर्भातली माहिती अजून समोप आलेली नसली तरी दिवाळीपूर्वी सणासुदीच्या काळात हे नवे मॉडेल लाँच केले जाण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्सनेही यावर्षी नेक्सॉन सीएनजी लाँच करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
ट्विन सीएनजी सिलिंडर टेक्नॉलॉजी मिळणार
नेक्सॉन सीएनजी मध्ये टाटाच्या नाविन्यपूर्ण ट्विन सीएनजी सिलिंडर टेक्नॉलॉजीसह 1.2 लीटर, 3-सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. मात्र, टाटाने आपले मायलेज आणि पॉवरचे आकडे जाहीर केलेले नाहीत. हा ट्विन सिलिंडर सेटअप टियागो आणि टिगोर सीएनजीमध्येही देण्यात आले आहे. यामध्ये बूट फ्लोअरच्या खाली दोन सीएनजी सिलिंडरच्या टॅंक ठेवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे बूट स्पेसचे फारसे नुकसान होत नाही. तसेच कारच्या तळाशी स्पेअर व्हील ठेवण्यात आले आहे.
सीएनजीवर सुरू होणार
सीएनजी नेक्सनची स्टायलिंग नियमित पेट्रोल आणि डिझेल नेक्सनसारखीच आहे. सीएनजी ते पेट्रोल मोडदरम्यान फास्ट शिफ्टसाठी एसयूव्ही सिंगल ईसीयूसह येते. टाटा नेक्सॉन थेट सीएनजी मोडमध्ये देखील सुरू होऊ शकते, यात इंधन फंक्शन्सदरम्यान ऑटो स्विच आहे.
कर्व्ह लवकरच लाँच होणार
केवळ नेक्सॉन सीएनजीच नाही तर टाटा मोटर्सनेही कर्व्ह एसयूव्ही कूपे देखील यावर्षी भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली आहे. आधी त्याचे इलेक्ट्रिक व्हेरियंट येईल, त्यानंतर आयसीई मॉडेल येईल. भारत मोबिलिटी शोमध्ये टाटाने कर्व्ह एसयूव्ही डिझेल पॉवरट्रेनसोबत येणार असल्याची माहिती दिली आहे. यात 1.5 लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन मिळेल. जे नेक्सनमध्येही पाहायला मिळते.
इतर महत्वाची बातमी-
Car loan Information:
Calculate Car Loan EMI