Skoda Slavia Style Edition : दिग्गज कार निर्माता कंपनी स्कोडाने (Skoda) भारतीय बाजारात आपली नवीन कार नुकतीच लॉन्च केली आहे. ही नवीन कार मिड साईज आकाराची असून सेडान स्लाविया (Skoda Slavia) असं या कारचं नाव आहे. ही एक लिमिटेड एडिशन व्हेरिएंटची कार आहे. स्कोडा स्लाविया स्टाईल एडिशनच्या नावाने लॉन्च झालेल्या या स्पेशल एडिशनची एक्स शो रूम किंमत 19.13 लाख रूपये आहे. पण, या नवीन एडिशनच्या केवळ 500 युनिट्सची विक्री होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर स्कोडा कारप्रेमी असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. ही लिमिटेड व्हेरिएंट अनेक कॉस्मेटिक अपडेटसह उपलब्ध असेल. तसेच, ही कार केवळ सिंगल पॉवरट्रेनच्या पर्यायांसह उपलब्ध आहे.  


स्लाविया पॉवरट्रेन 


स्कोडा स्लाविया स्टाईल एडिशन सेडानच्या टॉप ऑफ द लाईन स्टाईल व्हेरिएंटवर आधारित आहे. या कारची किंमत रेग्युलर स्टाईल व्हेरिएंटच्या जवळपास 30 हजार रूपयांनी जास्त आहे. या सेडानला पॉवर देण्यासाठी एक 1.5 लीटर 4 सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. जे 150ps ची पॉवर आणि 250nm चं टॉर्क जनरेट करण्यास मदत करतात. या इंजिनला 7 स्पीड डीएसजी या ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या माध्यमातून  फ्रंट व्हिल ड्राईव्ह सिस्टिमसह जोडण्यात आला आहे. 


विविध कलर ऑप्शन्स उपलब्ध


स्लाव्हिया स्टाईल एडिशन 3 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात कँडी व्हाइट, ब्रिलियंट सिल्व्हर आणि टोर्नाडो रेड यांचा समावेश आहे. सेडान अनेक नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे, ज्यामध्ये ड्युअल डॅश कॅमेरा, स्लाव्हिया स्कफ प्लेट, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आणि हवेशीर फ्रंट सीट्स आणि बरेच काही समाविष्ट आहे.


या विशेष व्हेरिएंटमध्ये इलेक्ट्रिक सनरूफसह ब्लॅक रूफ फॉईल, स्टीयरिंग व्हील 'स्टाईल एडिशन' बॅजिंग, ड्युअल डॅश कॅमेरा, स्लाव्हिया स्कफ प्लेट, बी-पिलरवर स्पेशल 'स्टाईल एडिशन' बॅजिंग, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल फ्रंट सीट्स, हवेशीर फ्रंट सीट्स, स्कोडा लोगो लॉन्च करण्यात आला आहे. 


कोणत्या कारशी स्पर्धा करणार?


नवीन स्कोडा स्लाविया कार Hyundai Verna आणि Honda City यांच्याशी स्पर्धा करणार आहे. Verna मध्ये 1.5 लिटर पेट्रोल आणि 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय आहे. तर होंडा सिटीमध्ये 1.5 लिटर पेट्रोल आणि 1.5 लीटर ॲटकिन्सन सायकल पेट्रोल हायब्रिड इंजिनचा पर्याय आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Mercedes-Benz ने सादर केली AMG Vision Gran Turismo सुपर कार; फिचर्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल


Car loan Information:

Calculate Car Loan EMI