Royal Enfield Shotgun 650 : सध्या सगळीकडेच Royal Enfield ची क्रेझ आहे. त्यातच आता रॉयल एनफिल्डने गोव्यात आपल्या वार्षिक रायडर मेनिया इव्हेंटमध्ये नवीन हिमालयन 450 ड्युअल पर्पज मोटरसायकल लाँच केली आहे. तसेच कंपनीने या इव्हेंटमध्ये नवीन रॉयल एनफिल्ड शॉटगन 650 मोटॉवर्स एडिशन सादर केले आहे. हे रॉयल एनफिल्ड शॉटगन 650 संकल्पनेचे उत्पादन मॉडेल आहे. जे 2021 EICMA मोटर शोमध्ये सादर करण्यात आले होते. या शोमध्येदेखील ही बाईक उठून दिसत होती आणि या शो मध्ये अनेकांनी या बाईकला पसंती दर्शवली.


केवळ 25 युनिट उपलब्ध...


मोटारसायकल फॅक्टरी-कस्टम आहे आणि केवळ 25 युनिट तयार केली जाईल.  हे उत्पादन-स्पेक मॉडेलच्या स्टाईलमध्ये प्रिव्हिव्ह दाखवत आहे. शॉटगन मोटोव्हर्स एडिशनची एक्स-शोरूम किंमत 4.25 लाख रुपये असून या 25 युनिट्सची डिलिव्हरी जानेवारी 2024 मध्ये सुरू होईल. हे 25 ग्राहक जागतिक स्तरावर शॉटगन 650 चे पहिले मालक असतील. रॉयल एनफिल्ड शॉटगन 650 ही कंपनीची चौथी 650 सीसी ट्विन सिलिंडर मोटारसायकल आहे, तर इंटरसेप्टर 650, कॉन्टिनेंट जीटी 650 आणि सुपर मिटिओर 650 आधीपासूनच आहेत.


रॉयल एनफील्ड शॉटगन 650 स्पेसिफिकेशन्स काय आहेत?


नवीन रॉयल एनफिल्ड शॉटगन 650 त्याच प्लॅटफॉर्मवर आधारित आहे जे सुपर मिटिओर 650, इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 साठी वापरले जाते. यात 647.95cc एअर/ऑईल कूल्ड पॅरेल-ट्विन इंजिन असेल जे 47.65 PS जास्तीत जास्त पॉवर आणि 52 nM पीक टॉर्क जनरेट करते. यात शोवा-सोर्स ेड यूएसडी फ्रंट फोर्क आणि मागील बाजूस ट्विन शॉक अॅब्जॉर्बर देण्यात आले आहेत. ब्रेकिंगसाठी बिब्रे फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत, जे ड्युअल चॅनेल एबीएस सिस्टमने तयार करण्यात आलं आहेत. 


नवीन रॉयल एनफिल्ड शॉटगन 650 ची लांबी 2170 मिमी, रुंदी 820 मिमी आणि उंची 1105 मिमी आहे. मात्र, आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. सुपर मिटिओर 650 च्या तुलनेत ही बाईक कॉम्पॅक्ट असून सीटची उंची जास्त आहे. या मोटारसायकलचा व्हीलबेस 1465 mm आहे. ही मोटारसायकल शॉटगन 650 कॉन्सेप्टसारखीच आहे. हेडलाईट ब्रॅकेटचा आकार आणि अपशॉट ड्युअल-एक्झॉस्ट सिस्टम देखील सारखं आहे. यात ही संकल्पनेप्रमाणेच मोठी फ्यूल टँक आणि सिंगल सीट सेटअप देण्यात आला आहे. 


हेही वाचा:


New Bike Launched: रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 लाँच; जाणून घ्या बाईकचे दमदार फिचर्स आणि किंमत


Car loan Information:

Calculate Car Loan EMI