Car Care Tips: तुमच्या कारमधून (Car) चांगलं मायलेज मिळवणं हे केवळ खिशासाठीच नाही, तर पर्यावरणासाठीही चांगलं आहे. जर तुमची कार चांगलं मायलेज देत असेल, तर तुम्हाला इंधनावर जास्त पैसे खर्च करण्याची गरज भासत नाही. मात्र जर तुमची कार कमी मायलेज देत असेल तर तुमचं नुकसान होत राहील. तुम्हाला जास्त इंधन वापरावं लागेल आणि त्यामुळे प्रदूषणही होत राहील. पेट्रोलवरील खर्च टाळण्यासाठी आणि चांगल्या मायलेजसाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे, ज्याबद्दल पुढे जाणून घेऊया. 


पेडलचा वापर आरामात करा


अचानक वेग किंवा ब्रेक मारल्यास, गाडी वेगात चालवल्यास जास्त इंधनाचा वापर होतो, त्यामुळे तुमच्या खिशाला थेट फटका बसतो. हे टाळलं पाहिजे. 


वेग मर्यादेत ठेवा


गाडी चालवताना 80-90 पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवू नका. जास्त वेगामुळे इंजिनवर दबाव पडतो, ज्यामुळे कार कमी मायलेज देते आणि तुमचं खिशाचं बजेट खराब होतं. 


गाडीतील अनावश्यक वस्तू काढून टाका


तुमच्या कारमध्ये अनावश्यक सामान असल्यास ते काढून टाका, कारण अनावश्यक सामानामुळे गाडीच्या वजनात भर पडते आणि मायलेज कमी होते. अंदाजे 50 किलो वजनामागे मायलेजमध्ये 1 टक्क्यांपर्यंत घट होते.


क्रूझ कंट्रोलचा वापर करा


तुम्ही प्रवास करत असलेले रस्ते या वैशिष्ट्यासाठी योग्य असतील आणि तुमच्या कारमध्ये क्रूझ कंट्रोल फिटर उपलब्ध असेल तर तुम्ही ते वापरलं पाहिजे. फक्त डोंगराळ भागात किंवा गर्दीच्या ठिकाणी हा पर्याय वापरणं टाळावं. 


...तर कार बंद करा


गाडी चालवताना सिग्नलमुळे किंवा काही कामासाठी रस्त्यावरच कुठेतरी थांबावं लागत असेल आणि ज्यासाठी 10-15 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागणार असेल तर गाडीचं इंजिन बंद करावं. विनाकारण गाडी चालू ठेवल्याने इंधनाचा अपव्यय होतो, जे केवळ खिशासाठीच नाही तर, पर्यावरणासाठीही हानिकारक आहे. 


योग्य टायर प्रेशर राखा


टायरमध्ये कमी किंवा जास्त हवा असल्यामुळे वाहनाच्या मायलेजवरही परिणाम होतो, हेही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. टायर्समधील हवेचे विहित मानक बदलतं, हे लक्षात घेऊन, तुमच्या कारमध्ये हवा पंप करा. 


एअर फिल्टर


वाहनाचा एअर फिल्टर वेळोवेळी बदलला पाहिजे, कारण गलिच्छ एअर फिल्टरमुळे मायलेजही कमी होतो.  


सकाळी किंवा रात्री कारमध्ये इंधन टाका


गाडीचं मायलेज इंधनाच्या प्रमाणावरही अवलंबून असतं. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही सकाळी लवकर किंवा रात्री इंधन भरता तेव्हा टाकी जास्त भरते आणि त्यामुळे मायलेजही वाढतं. 


हेही वाचा:


New Bike Launched: रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 लाँच; जाणून घ्या बाईकचे दमदार फिचर्स आणि किंमत


Car loan Information:

Calculate Car Loan EMI